Deool Band 2 Collection : आरं रं रं रं रं रं खतरनाक! प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री, स्वामी भक्तांनी थिएटर गाजवले

Deool Band 2 movie Cross 100 Crore Worldwide : प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाने अखेर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. 'देऊळ बंद २'ने मराठी चित्रपट इंडस्ट्रीत इतिहास रचला.
Deool Band 2 movie Cross 100 Crore Worldwide
Deool Band 2 Collectionsaam tv
Published On
Summary

'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला रिलीज

प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपट १०० कोटी पार

'देऊळ बंद २' ने मराठी चित्रपटसृष्टीत रचला इतिहास

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'नंतर प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाने जगभरात डंका वाजवला आहे. 'देऊळ बंद २' चित्रपटाने अखेर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. 'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला रिलीज झाला होता. चित्रपटात ज्येष्ठ मराठी अभिनेते मोहन जोशींनी स्वामींची भूमिका साकारली. 'देऊळ बंद २' मध्ये देवाची परीक्षा पाहायला मिळाली. हा चित्रपट शेतीवर आधारित आहे. स्नेहल तरडे महिला शेतकऱ्यांच्या भूमिकेत झळकली.

'देऊळ बंद २' कलेक्शन

  • बॉक्स ऑफिस - ९१. ५० कोटी रुपये

  • इतर देश - ६. ५५ कोटी रुपये

  • तंबू शो - २. ४५ कोटी रुपये

  • जगभरात - १०० कोटी पार रुपये

'देऊळ बंद २' स्टारकास्ट

'देऊळ बंद २' चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडेंनी केले आहे. शिवाय ते या चित्रपटातही अभिनेत्याच्या रुपात झळकले आहेत. यांच्यासोबतच चित्रपटात महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड,रमेश परदेशी,ओम भूतकर, सुनील अभ्यंकर, संस्कृती बालगुडे, मुकुंद वसुले, अतुल कुदले, अनिरुद्ध दिंडोरकर आणि हिृषीकेश वांबुरकर हे कलाकार झळकले आहेत.

'देऊळ बंद २' चित्रपटातील गाजलेले डायलॉग

  • 'देशात सगळं ओरिजनल, डुप्लिकेट फक्त शेतकरी...'

  • '१० दिवसांत एक जरी आत्महत्या झाली तर माझं देऊळ बंद!'

  • 'मी तुमचं अस्तित्व मान्य करेन पण, तुम्ही आधी परीक्षा द्या...'

Deool Band 2 movie Cross 100 Crore Worldwide
July 1st Week Movie Releases : मराठी - हिंदी चित्रपटांमध्ये पुन्हा तगडी टक्कर; एकाच दिवशी रिलीज होणार 'हे' ४ सिनेमे, आताच तारीख SAVE करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com