Shah Rukh Khan-Pravin Tarde : प्रवीण तरडेंचे शाहरुख खानसोबत खास कनेक्शन, 'देऊळ बंद २'साठी 'किंग'नं केलं असं काही की वाचून तुम्ही चकित व्हाल

Shah Rukh Khan Connection With Deool Band 2 : बॉलिवूडच्या किंगचे म्हणजे शाहरुख खानचे प्रवीण तरडेंसोबत आणि 'देऊळ बंद २'सोबत खास कनेक्शन आहे. स्वतः प्रवीण तरडेंनी याचा खुलासा केला.
Shah Rukh Khan Connection With Deool Band 2
Shah Rukh Khan-Pravin Tardesaam tv
Published On
Summary

'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ

प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला रिलीज

'देऊळ बंद २' आणि प्रवीण तरडेंचे किंग खानसोबत खास कनेक्शन

प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद २' चित्रपट सध्या जगभर गाजत आहे. 'देऊळ बंद २' हा स्वामी भक्ती आणि शेतकऱ्यांचे जीवन यावर आधारित आहे.'देऊळ बंद २' सिनेमा २१ मे ला थिएटरमध्ये रिलीज झाला. चित्रपटाने आतापर्यंत तब्बल ८० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आता लवकरच 'देऊळ बंद २' १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करेल. 'देऊळ बंद २'मध्ये शेतकरी महिला स्वामींची परीक्षा घेताना दिसत आहे.स्वामी शेतकरी महिलेसोबत प्रवास करताना, तिच्याशी बोलताना , शेतात, दऱ्याखोऱ्यांमध्ये, एसटीने फिरताना दिसत आहेत. 'देऊळ बंद २' आणि प्रवीण तरडेंचे बॉलिवूडचा किंग सुपरस्टार शाहरुख खानसोबत एक खास कनेक्शन आहे.

अभिजात मराठीला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडे 'देऊळ बंद २' चित्रपटाबद्दल म्हणाले की, "पुण्यात हेमंत गुजराती यांचा 'डॉन' नावाचा स्टुडिओ आहे, त्यांचे मी विशेष आभार मानतो. चित्रपटाचे बजेट संपले होते. चित्रपटाचा DCP (Digital Cinema Package) जो 'देऊळ बंद २' थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी वापरला जाणारा डिजिटल फॉरमॅट होता. पण आमच्याकडे त्यासाठी पैसे नव्हते. कारण चित्रपटाचे बजेट १२ लाखांवरून थेट ४२ लाखांपर्यंत अधिच पोहोचले होते. आता यासाठी एवढे पैसे कुठून आणणार?"

प्रवीण तरडे पुढे म्हणाले की, "मग आम्ही शाहरुख खान यांच्या रेड चिलीज कंपनीला विनंती केली. तेव्हा हे सर्व शाहरुख खानला समजले. शाहरुख खान यांनी टेक्नीशियनला विचारले कसा आणि कोणाचा चित्रपट आहे. तेव्हा ते म्हणाले, 'मुळशी पॅटर्न' वाल्याचा चित्रपट आहे. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, सलमान खानने 'अंतिम' चित्रपट केला होता. हे समजताच शाहरुख खानने बिल माफ करायला सांगितले कारण चित्रपट चांगला आहे. नाहीतर पैसे दिल्याशिवाय डीसीपी काढत नाही. रेड चिलीजने ४० की ४५ टक्के बिल माफ केले. ते म्हणाले, चित्रपट चांगला आहे. पैशांचे नंतर बघू...मी शाहरुख खान सरांचा कायम ऋणी राहिन..."

'देऊळ बंद २' स्टार कास्ट

'देऊळ बंद २' चित्रपटात स्वामींच्या भूमिकेत ज्येष्ठ मराठी अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेत्री स्नेहल तरडे झळकले आहे. यांच्यसोबतच सिनेमात प्रवीण तरडे महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड,रमेश परदेशी,ओम भूतकर, सुनील अभ्यंकर, संस्कृती बालगुडे, मुकुंद वसुले, अतुल कुदले, अनिरुद्ध दिंडोरकर आणि हिृषीकेश वांबुरकर हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत.

Shah Rukh Khan Connection With Deool Band 2
Veen Doghantali Hi Tutena video : "मी खाणं-पिणं सोडून देईन..."; समर स्वानंदीच्या आयुष्यात एका पाठोपाठ एक संकटं, नव्या ट्विस्टनं राजवाडेंच्या घरात वादळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com