Prasad Vedpathak: 'हा माझा शेवटचा व्हिडीओ...'; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक ढसाढसा रडला, हात जोडत म्हणाला...

Prasad Vedpathak: पांढऱ्या पट्टीच्या वादानंतर युट्यूबर प्रसाद वेदपाठक यांनी भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करत त्यांनी मदतीचे आवाहन केले.
Prasad Vedpathak
Prasad VedpathakSaam Tv
Published On

Prasad Vedpathak: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. घाटकोपरमधील पांढऱ्या पट्टीच्या वादानंतर आता त्याने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ शेअर करत आपल्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला आहे. तसेच आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त करत त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासनाकडे मदतीचे आवाहन केले आहे.

काही दिवसांपूर्वी घाटकोपरमधील एका सोसायटीमध्ये जैन धर्मगुरूंसाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीला प्रसाद वेदपाठक यांनी विरोध दर्शवला होता. त्यांच्या मते, सोसायटीतील सदस्यांची परवानगी न घेता ही पट्टी मारण्यात आली होती. यामुळे आपल्या आणि कुटुंबाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावा त्यांनी केला होता. वाढत्या वादानंतर संबंधित पांढरी पट्टी हटवण्यात आली आणि त्यानंतर हा विषय संपल्याचेही प्रसाद यांनी सोशल मीडियावर म्हटले होते.

Prasad Vedpathak
Actor Death: मराठी नाट्यविश्वातील ज्येष्ठ अभिनेते- गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरता श्वास

मात्र त्यानंतर या प्रकरणाला धार्मिक आणि राजकीय वळण मिळाले. हा वाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. दरम्यान, प्रसाद वेदपाठकने नव्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काही गंभीर आरोप केले आहेत. त्याने सांगितले की, या वादानंतर त्यांच्यावर विविध प्रकारचा दबाव टाकला जात आहे. काही लोकांकडून पाठलाग केला जात असल्याचा तसेच कुटुंबीयांना धमकावण्याचा प्रयत्न होत आहे. असे तो या व्हिडिओमध्ये म्हणाला.

Prasad Vedpathak
Rakhi Sawant: 'काय हा प्रकार...'; राखी सावंतचा नवा रेड ड्रेस लूक पाहून नेटकरी हैरान, VIDEO व्हायरल

व्हिडीओमध्ये बोलताना प्रसाद वेदपाठक भावूक झाल्याचे दिसून आले. "माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यासोबत पुढे काय होईल, हे मला माहीत नाही. कदाचित हा माझा शेवटचा व्हिडीओ असेल," असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासनाला या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आवाहन केले. तसेच, आपल्याविरोधात सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. "मी कधीही चुकीचे काम केले नाही. माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे," असेही त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com