Prahaar: मराठीचा चॉकलेट बॉय आता कसाबच्या भूमिकेत...; राजकुमार रावच्या प्रहारमध्ये या मराठमोळ्या अभिनेत्याची दमदार एन्ट्री

Lalit Prabhakar: सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या कारकिर्दीवर आधारित ‘प्रहार’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. ललित प्रभाकर अजमल कसाबच्या भूमिकेत दिसणार असून चित्रपट 7 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
prahaar movie lalit prabhakar
prahaar movie lalit prabhakarSaam Tv
Published On

Lalit Prabhakar: मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या खटल्याची कथा आता रुपेरी पडद्यावर येणार आहे. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या घटनांवर आधारित ‘प्रहार’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. फर्स्ट लूक समोर येताच चित्रपटाची चर्चा सुरू झाली असून अभिनेता ललित प्रभाकर याच्या भूमिकेने विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

‘प्रहार’ या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव हे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर मराठी अभिनेता ललित प्रभाकर हा 26/11 मुंबई हल्ल्यातील जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाबची भूमिका साकारणार आहे. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये ललित प्रभाकरचा धक्कादायक अवतार पाहायला मिळत असून त्याच्या लूकचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

प्रहारमधील ललितची पहिली झलक पाहिल्यानंतर त्याच्या मराठी चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या व्हायरल लूकवर नेटकरी मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, खरचं तू कसाबच्या भूमिकेत असणार आहेस? तर आणखी एकाने लिहिले, मराठी सुपरस्टार आता राजकुमारसोबत दिसणार. तर आणखी एकाने लिहिले, मराठीचा चॉकलेट बॉय आता कसाबच्या भूमिकेत. तुला मोठ्या पडद्यावर बघायला मज्जा येणार आहे.

prahaar movie lalit prabhakar
Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

चित्रपटाची कथा उज्ज्वल निकम यांनी लढलेल्या महत्त्वाच्या खटल्यांवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर कसाबविरोधात चाललेल्या ऐतिहासिक खटल्यातील कायदेशीर लढाई या चित्रपटाचा केंद्रबिंदू असणार आहे. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये राजकुमार राव यांचा गंभीर आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाज पाहायला मिळतो. तर दुसरीकडे ललित प्रभाकरचा कसाबच्या रूपातील लूक अंगावर काटा आणणारा वाटत आहे. वास्तववादी मांडणी आणि ऐतिहासिक घटनांवर आधारित कथानकामुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

prahaar movie lalit prabhakar
Samantha Ruth Prabhu: ३९ व्या वर्षी अभिनेत्री होणार आई, समंथाने चाहत्यांसोबत शेअर केली प्रेग्नन्सीची गोड बातमी

चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक करण शर्मा यांनी केले असून निर्मिती टी-सीरिजच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. ‘प्रहार’ हा चित्रपट 7 ऑगस्ट 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com