Pati Patni Aur Woh 2: आयुष्यमान खुराणा पडला ३ सुंदरींच्या प्रेमात; 'पति पत्‍नी और वो 2' चा अतरंगी टीजर रिलिज

Pati Patni Aur Woh 2: आयुष्मान खुराना, वामिका गब्बी, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंग यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'पती पत्नी और वो २' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. .यावेळी आयुष्मान खुराना हटके भूमिकेत दिसणार आहे.
Pati Patni Aur Woh 2
Pati Patni Aur Woh 2Saam tv
Published On

Pati Patni Aur Woh 2: आयुष्मान खुराना, वामिका गब्बी, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंग यांची मुख्य भूमिका असलेल्या 'पती पत्नी और वो २' (Pati Patni Aur Woh 2) या चित्रपटाचा एक अत्यंत विनोदी टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपट निर्मात्यांनी अवघ्या दोन दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. आता, सोमवारी प्रदर्शित झालेल्या १ मिनिट २२ सेकंदांच्या या टीझर प्रदर्शित झाला आहे. १५ मे २०२६ रोजी हा विनोद सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

टीझरची सुरुवात एका भारदस्त आणि दैवी आवाजाने होते, जो आपल्याला बी.आर. चोप्रा यांच्या गाजलेल्या 'महाभारत' मालिकेच्या 'कालचक्रा'ची (Wheel of Time) ओळख करून देतो. "मी काळ आहे...". हे कालचक्र आपल्याला सांगते की, काळाच्या ओघाने सर्व काही बदलले आहे. मग ते राजे, ऋषीमुनी आणि योद्ध्यांच्या गाथा असोत, 'बिग बँग थिअरी' असो, किंवा अगदी डायनासोरची अंडी असोत. मात्र, एक गोष्ट अशी आहे जी आजही तशीच अपरिवर्तित राहिली आहे आणि ती म्हणजे "पतींचा स्वभाव."

Pati Patni Aur Woh 2
Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, सिनेविश्वात हळहळ

कालचक्राच्या जोडीनेच, हा टीझर आपल्याला १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि संजीव कुमार, विद्या सिन्हा व रंजीता कौर यांची भूमिका असलेल्या मूळ 'पती पत्नी और वो' चित्रपटाची झलक दिसते. त्यानंतर, २०१९ मधील याच चित्रपटाच्या रिमेकची झलक दिसते. यामध्ये कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांच्यासोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर आताची स्टोरी दिसते ज्यामध्ये आयुष्मान खुराना आणि वामिका गब्बी, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंग.

Pati Patni Aur Woh 2
Bigg Boss Marathi 6: 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय...'; राखी सावंतचं व्यक्त केली धक्कादायक इच्छा

यूट्यूबवर हा टीझर शेअर करताना, चित्रपट निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहीले, ज्यात म्हटले आहे. "काळ सर्व काही बदलतो... पण खुद्द काळाचेही पतींच्या स्वभावावर काहीच नियंत्रण चालत नाही. प्रजापती पांडे येत आहे आणि यावेळी तो सोबत त्याची पत्नी आणि दोन 'इतर स्त्रियांना' घेऊन येत आहे!"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com