Bigg Boss Marathi 6: 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय...'; राखी सावंतचं व्यक्त केली धक्कादायक इच्छा

Bigg Boss Marathi 6: राखी सावंतने 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय' असं धक्कादायक वक्तव्य केल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. बिग बॉस मराठी 6 नंतरही दोघांच्या नात्याची चर्चा जोरदार रंगली आहे.
Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6Saam Tv
Published On

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी ६ मुळे सोशल मीडियावर ट्रेंड असलेली अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या विचित्र वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राखीने अभिनेता राकेश बापट याच्याबद्दल मोठं आणि धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईला'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राखी सावंत म्हणाली की, 'मी बिग बॉसच्या घरात राकेशसोबत खोटा लव्ह अँगल केला होता. पण तो खूप चांगला वागला माझ्यासोबत. त्यानं माझी काळजी घेतली. तेव्हाच राकेशसोबत लव्ह अँगल करायचं मी ठरवलं. पण, नाटक करताना मी खरचं त्याच्या प्रेमात पडले.  मी राकेशला लग्नाबद्दल विचारलेलं. मी त्याला सांगितलेलं आपण लग्न करूयात, मला तुझ्या मुलांची आई व्हायचंय. मी त्याच्या कुटुंबीयांचा आदर करते.

Bigg Boss Marathi 6
Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, सिनेविश्वात हळहळ

राखी पुढे म्हणाली, 'राकेशला इम्प्रेम करण्यासाठी मी जेवण बनवायला लागले. तो माझं कौतुक करायचा.  एक दिवस त्याच्याकडे मी स्पर्म मागितले. मी त्याला म्हटलं, तुला लग्न नाही करायचंय, आयव्हीएफ करू आपण. मला आई व्हायचंय. तो आधी घाबरला. मी म्हटल, आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करूया.पण, राकेश मला म्हणाला 'तू जर बॉलिवूड मीडिया सगळं सोडणार असशील तर मी लग्न करेन' 

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Winner: 'तन्वी कोलते हा ब्रॅण्ड बनून...'; 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी जिंकल्यावर तन्वी कोलते झाली भावूक

बिग बॉस मराठी 6’मध्ये राखी सावंत वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. शोदरम्यान तिने राकेश बापटबद्दल अनेकदा आपले प्रेम व्यक्त केले होते. दोघांमधील केमिस्ट्री आणि नात्याबद्दल प्रेक्षकांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, राकेशने वारंवार राखीसोबत फक्त मैत्री असल्याचं स्पष्ट केलं होतं. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी 6’ हा सीझन प्रचंड गाजला असून, राकेश बापट उपविजेता ठरला तर तन्वी कोलतेने ट्रॉफी जिंकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com