Bigg Boss Marathi 6 Winner: बिग बॉस मराठी सिझन ६ ची धमाकेदार सुरुवात तीन महिन्याआधी कलर्स मराठी वाहिनीवर झाली. बिग बॉस मराठी सिझन ६ देखील महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचला आणि कानाकोपर्यात फक्त याच कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली. बिग बॉस मराठीच्या या सिझनमध्ये सदस्य १०० दिवसं कॅमेरांच्या नजरकैदेत राहिले. या घराने आणि महाराष्ट्राने सदस्यांमधील भांडणं, वाद-विवाद, मैत्री, भावनांचे उतार-चढाव आणि नात्यांचे बदलते रंग पाहिले. आता अखेर हा शंभर दिवसांचा रोमांचक प्रवास आज संपन्न झाला. बिग बॉस मराठी सिझन ६ चा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबईमध्ये पार पडला.
या घराने गेल्या १०० दिवसांत प्रत्येक भावनेचा साक्षीदार होत अनेक रंग दाखवले कधी मैत्रीची घट्ट नाती जुळताना पाहिली, तर कधी त्याच नात्यांमध्ये कटुता येताना अनुभवली. सदस्यांचे रडणं–हसणं, तक्रारी, मतभेद आणि स्पर्धेची धग यामुळे प्रत्येक दिवस नवा वाटत गेला. कॅमेरांच्या नजरकैदेत प्रत्येकाचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आला. या सगळ्या प्रवासात तन्वीने आपल्या रोखटोक बोलण्याने, जिद्दीने आणि ठाम मताने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आणि प्रेक्षकांचा विश्वास जिंकला.
विजेती ठरल्यानंतर भावना व्यक्त करताना तन्वी कोलते म्हणाली, “हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि शिकवणारा ठरला. या घराने मला स्वतःला ओळखायला शिकवलं, प्रत्येक परिस्थितीत ठाम राहायला शिकवलं. प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आणि पाठिंबा हीच माझी खरी ताकद आहे. हा विजय मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करते. मला सगळे घरात बोलत होते विचारत होते काय काम केलंस, काय नावं तेव्हा वाईट वाटायचे पण मी ठरवलं होतं या घरातून बाहेर पडेन तेव्हा सगळ्यांच्या तोंडी माझंच नावं असेल. बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केले आहे, आले होते तन्वी कोलते म्हणून जाते आहे तन्वी कोलते हा ब्रॅण्ड बनून”.
या ग्रँड फिनालेमध्ये टॉप 5 स्पर्धक राकेश बापट, तन्वी कोलते, अनुश्री माने, विशाल कोटियन, दिपाली सय्यद त्यामध्ये आधी दिपाली सय्यद बाहेर गेली. नंतर अनुश्री माने, तिच्या पाठोपाठ विशाल कोटियन हा स्पर्धक यानंतर उपविजेता राकेश बापट हा स्पर्धक ठरला तर तन्वी कोलते हा स्पर्धक विजेता ठरला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.