Paathan: शाहरुख खानच्या 'पठान'वरून गदारोळ झाला आहे. चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्याबद्दल काही लोक सातत्याने विरोध करत आहेत. या प्रकरणी शाहरुख खानने गुरुवारी कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, “जग आता लॉकडाऊनपासून हळू हळू पुर्वपदावर येत आहे. आम्ही सर्व आनंदी आहोत आणि हे सांगण्यास माझा अजिबात आक्षेप नाही. जग काय करते याने फरक पडत नाही, आमच्यासारखे लोक नेहमीच सकारात्मक राहतील, आम्ही जिवंत आहोत याचा मला आनंद आहे."
आता भाजपच्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शाहरुख खानच्या या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. खासदार नवनीत राणा म्हणतात, "आम्ही देखील सकारात्मक आहोत. जर एखाद्या गोष्टीने देश दुखावला असेल तर त्यासाठी सेन्सॉर बोर्ड आहे. चित्रपटावर बहिष्कार टाकू नये, सेन्सॉर बोर्डाने चांगले काम करावे."
एएनआयशी बोलताना नवनीत राणा म्हणाले, "जर काही अडचण असेल आणि आमच्या भावना दुखावल्या असतील, तर सेन्सॉर बोर्डाने एडिट करुन ते रिलीज करावे". यानंतर नवनीतने शाहरुखच्या सकारात्मक वक्तव्यावर तिची प्रतिक्रिया दिली.
नवनीत राणा चित्रपटाविषयी म्हणतात, 'आम्हीही खूप सकारात्मक आहोत, पण मला वाटते की आमच्या भावना आणि गोष्टींशी खेळले जात असेल तर त्यासाठी सेन्सॉर बोर्ड आहे आणि त्यांनी त्यांचे काम केले पाहिजे. आम्हीही खूप सकारात्मक आहोत. आपल्या देशातील सर्व स्टार्सवर बहिष्कार टाकू नये. ते आपल्या देशाला आर्थिक मदत करतात'.
शाहरुख खानचा 'पठान' हिंदी सोबतच तामिळ आणि तेलुगुमध्ये 25 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'पठान'चे बजेट 250 कोटी रुपये आहे. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिकासोबत जॉन अब्राहम देखील दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.