Besharam Song Controversy: 'हिंदुत्वाचा अपमान करणारा चित्रपट...' आमदार राम कदम यांचा 'पठान' चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकांना इशारा

हिंदू सेनेने सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना पत्र लिहून चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
MLA Ram Kadam On Pathaan Movie
MLA Ram Kadam On Pathaan MovieSaam Tv

Ram Kadam On Pathaan Movie: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'पठान' वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अनेक हिंदू संघटना या चित्रपटाला विरोध करत आहेत. या चित्रपटावर आमदार राम कदम यांनी सुद्धा त्यांचा आक्षेप नोंदवला आहे. राम कदम यांनी ट्विट करत सांगितले आहे की, हिंदुत्वाचा अपमान करणारा चित्रपट किंवा मालिका महाराष्ट्रात चालणार नाही.

MLA Ram Kadam On Pathaan Movie
Laxmikant Berde: घरातच मिळाले होते लक्ष्याला विनोदाचे बाळकडू, एका मुलाखतीमध्ये सांगितली होती आठवण

'पठान' चित्रपटाला देशातील अनेक ऋषी-संत, महात्म्यांसह अनेक हिंदू संघटना आणि करोडो लोक सोशल मीडियावर कडाडून विरोध करत आहेत. अशा परिस्थितीत हा चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्या-दिग्दर्शकाची जबाबदारी आहे की, त्यांनी पुढे येऊन संतांकडून जे काही आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या जात आहेत, त्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. महाराष्ट्रात सध्या हिंदुत्वाच्या विचारसरणीचे सरकार आहे, असे राम कदम यांनी म्हटले आहे. (Ram Kadam)

'पठान' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यामध्ये दीपिका पदुकोण भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. गाण्याचे शीर्षक 'बेशरम रंग' असे आहे, त्यामुळे या गाण्यात भगव्या रंगाला बेशरम संबोधण्यात आल्याचे बोलले जात आहे. इंदौरमध्ये शाहरुख आणि दीपिकाच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले. 'पठान' चित्रपटाच्या विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे. (Protest)

हिंदू आणि मुस्लिम संघटनांनी याआधीच चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारा दिला होता. आता हिंदू सेना 'पठान'विरोधात मैदानात उतरली आहे. हिंदू सेनेने सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना पत्र लिहून चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. 'बेशरम रंग' हे गाणे पास कसे झाले, या गाण्यात भगव्या रंगाचेच वर्णन 'बेशरम' असे करण्यात आले आहे? असे प्रश्न सेन्सॉर बोर्डावरही उपस्थित केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com