Laxmikant Berde: घरातच मिळाले होते लक्ष्याला विनोदाचे बाळकडू, एका मुलाखतीमध्ये सांगितली होती आठवण

लक्ष्मीकांत यांच्या विनोदी स्वभाचे श्रेय ते त्यांच्या आईला देतात.
Laxmikant Berde Death Anniversary
Laxmikant Berde Death AnniversarySaam Tv

Laxmikant Berde Death Anniversary: मराठी चित्रपट सृष्टीत आजही कोणाची उणीव भरून निघाली नसेल तर ती आहे लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे लाडक्या लक्ष्याची. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या अभिनयाने आणि विनोदाने प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेली जागा आजही कोणी घेऊ शकले नाही. लक्ष्मीकांत बेर्डे प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे आणि नेहमीच राहील. लक्ष्मीकांत यांनी जाऊन आज १८ वर्ष झाली आहेत. त्यानिमित्त जाणून घेऊया लक्ष्याच्या खास आठवणी.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांना विनोदाचे बाळकडू घरात मिळाले असे त्यांनी दूरदर्शनला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. बघूया काय म्हणाले होते लक्ष्मीकांत बेर्डे या मुलाखतीमध्ये. (Actor)

Laxmikant Berde Death Anniversary
Besharam Song Controversy: 'अभिनेत्रींचे कपडे पाहण्यापेक्षा...' दीपिका पदुकोणला ट्रोल करणाऱ्यांवर स्वरा भास्कर भडकली

लक्ष्मीकांत यांच्या आईला हृदयाचा आजार होता. त्यांना खूप त्रास होत होता म्हणून हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. जेव्हा लक्ष्मीकांत यांच्या आईला हॉस्पिटलमध्ये होत्या तेव्हा संप सुरू होता. त्यामुळे कुणाचा पायपोस कुणाला नव्हता. सगळी अंदाधुंदी तिथे चालू होती. अचानक लक्ष्मीकांत यांच्या आईचे नाव उच्चारले गेले. रजनी असे त्यांच्या आईचे नाव होते. लक्ष्मीकांत, त्यांचे मोठे भाऊ आणि वाहिनी यांनी रजनी यांना स्ट्रेचरवर बसवले आणि हॉस्पिटलच्या १४व्या मजल्यावर घेऊन नेले. डॉक्टरांनी रजनी यांना आतमध्ये नेलं आणि त्यांच्या भावाला आणि वहिनीला विचारलं 'तुम्ही कोणाला आणलं आहे. त्यावर ते म्हणाले रजनी बेर्डे, डॉक्टरांनी म्हटलं मी रजनी शहा यांना बोलावलं होत.'

लक्ष्मीकांत यांची आई जेव्हा स्ट्रेचरवरून बाहेर आली तेव्हा ती हसत होती. कारण त्यांना अॅबोर्शनसाठी आत नेले होते. अशा परिस्थितीत सुद्धा त्यांच्या आईच्या चेहऱ्यावर हसू होते. लक्ष्मीकांत यांच्या आई त्या दुखी, कष्टी चेहऱ्यातून सांगत होत्या की, 'विनोद फक्त तुलाच करता येत नाही सुशिक्षित लोक सुद्धा चांगला विनोद करतात.'

लक्ष्मीकांत यांच्या या विनोदी स्वभाचे श्रेय ते त्यांच्या आईला देतात. त्यांच्या गरिबीने त्यांनी हसायला आणि विनोद करायला शिकवले होते. लक्ष्मीकांत यांनी खूप कमीच काळ प्रेक्षकांना हसवलं. वयाच्या ५०च्या वर्षी त्यांचे निधन झाले. परंतु आजही लक्ष्या त्याच्या मित्रांच्या, सहकालाकारांच्या आणि प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. (Celebrity)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com