Besharam Song Controversy: 'अभिनेत्रींचे कपडे पाहण्यापेक्षा...' दीपिका पदुकोणला ट्रोल करणाऱ्यांवर स्वरा भास्कर भडकली

लिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने 'बेशरम रंग'वर प्रतिक्रिया दिली असून दीपिकाचे समर्थन करणारी पोस्ट शेअर केली आहे.
Swara Bhasker on Besharam Rang
Swara Bhasker on Besharam RangSaam Tv
Published On

Pathaan Movie: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या 'पठान' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावर सर्वत्र टीका होत आहे. एकीकडे या गाण्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असतानाच दुसरीकडे सोशल मीडियावरही या गाण्याचा जोरदार विरोध करण्यात येत आहे. गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण 'भगव्या रंगाच्या बिकिनी'मध्ये शाहरुखसोबत डान्स मूव्ह करताना दिसत आहे. अनेक धार्मिक संघटनांनी दीपिकाच्या या भगव्या रंगाच्या कपड्यांवर आक्षेप घेतला आहे.

गाण्यात 'भगवा' हा बेशरम रंग म्हणून जाणीवपूर्वक वापरला आहे असे धार्मिक संघटनांचे म्हणणे आहे. दीपिकाने ज्या पद्धतीने कपडे परिधान करून शाहरुखसोबत डान्स केला ते निषेध करण्यासारखा आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली असून दीपिकाचे समर्थन करणारी पोस्ट शेअर केली आहे.

Swara Bhasker on Besharam Rang
Laxmikant Berde: घरातच मिळाले होते लक्ष्याला विनोदाचे बाळकडू, एका मुलाखतीमध्ये सांगितली होती आठवण

कोणाचेही नाव न घेता स्वरा भास्करने पठान चित्रपटाला विरोध करणाऱ्या राजकारण्यांवर निशाणा साधला आहे, जे गाण्यात दीपिकाच्या आऊटफिट कलरवर प्रश्न उपस्थित करत आहेत आणि तिला वाईट म्हणत आहेत. स्वराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून दीपिका-शाहरुखच्या गाण्याचा फोटो शेअर करून तिची प्रतिक्रिया दिली आहे. (Swara Bhasker)

पोस्ट शेअर करताना स्वरा भास्करने लिहिले की, 'हे आहेत आमच्या देशातील सत्ताधारी राजकारणी... जर त्यांना अभिनेत्रींचे कपडे पाहत आहे त्यांना यातून वेळ मिळाला तर त्यांनी काम सुद्धा केले असते'. स्वराची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. चित्रपटाचे चाहते आणि दीपिका-शाहरुख या कलाकारांनी या गोष्टींवर सहमती दर्शवत आपापल्या सोशल अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. (Deepika Padukone)

Swara Bhasker Instagram Story
Swara Bhasker Instagram StorySaam Tv

'पठान' चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. तसेच सोशल मीडियावर 'बॉयकॉट पठान' ट्रेंड करत आहे. राजकीय नेते आणि काही संघटनेचे लोक चित्रपटगृहांना आणि पीव्हीआर मालकांना इशारा देत आहेत की पठान चित्रपट प्रदर्शित झाल्यास त्यांना नुकसान सहन करावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com