Raghav And Parineeti Wedding Location: राघव- परिणीती घेणार ‘या’ महागड्या रिसोर्टमध्ये सप्तपदी...

Parineeti- Raghav Wedding Venue Reveal: परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याची माहिती मिळत आहे.
Raghav And Parineeti Wedding Location
Raghav And Parineeti Wedding LocationInstagram
Published On

Raghav And Parineeti Wedding Location Discussion: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि नेते राघव चढ्ढा यांच्या लग्नाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. गेल्या महिन्यात १३ मे रोजी दिल्लीच्या कपूरथला हाऊसमध्ये साखरपुडा झाल्यानंंतर ही जोडी नेमकं लग्न कुठे करणार असा सर्वांनाच प्रश्न पडला. गेल्या काही दिवसांपासून ही जोडी कुठे साखरपुडा करणार अशी चर्चा सुरू असताना, नेमकी ही राजस्थानला गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी उदयपुरमधील एका आलिशान रिसॉर्टची निवड करण्यात आली असून सध्या त्यांच्या लग्नाची तयारी सुरू आहे.

Raghav And Parineeti Wedding Location
Sri Ganeshan Passed Away: भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन, नृत्य सादर करतानाच झाली देवाज्ञा...

परिणीती आणि राघव यांच्या रिलेशनची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. अनेकदा त्यांना त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारले असता, त्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अनेकदा चर्चा झाल्यानंतर परिणीती- राघव यांचा १३ मे रोजी साखरपुडा आटोपला. परिणीतीच्या एंगेजमेंटसाठी लाडकी बहीण प्रियांका चोप्राने ही साखरपुड्यासाठी हजेरी लावली होती. यावेळी तिने साखरपुड्यात बहिणीचे सर्वच कर्तव्ये पार पाडली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि राघवने उदयपुरमधील ओबेरॉल उदयविलास रिसॉर्टमध्ये लग्न करण्याचा प्लॅन करत आहेत. पिछोला लेकच्या किनारी हे पंचतारांकित हॉटेल असून सध्या हे बॉलिवूडचं क्यूट कपल लग्नाची तयारी करण्यामध्ये व्यग्र आहेत.

साखरपुड्याप्रमाणेच राघव- परिणीती त्यांचं लग्नदेखील नातेवाईक आणि आपल्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत सप्तपदी घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजस्थानमध्ये आता अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी देशातील नवीन वेडिंग डेस्टिनेशन म्हणून चर्चेत आले आहे. विकी कौशल आणि कतरिना सोबतच सिद्धार्थ- कियारा यांनीही राजस्थानमध्ये लग्न केले होते. आता त्यांच्यानंतर परिणीती आणि राघव राजस्थानमध्ये लग्न करण्याची शक्यता आहे. पण लग्नाला कोण कोण मंडळी उपस्थित राहणार? नक्की लग्न उदयपुरमध्येच होणार का? याविषयावर परिणीती व राघव यांनी बोलणं टाळलं आहे.

Raghav And Parineeti Wedding Location
HBD Tejasswi Prakash: इंजिनियर होण्याचे स्वप्न पाहणारी तेजस्वी प्रकाश कशी झाली अभिनेत्री ? जाणून घ्या तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास

मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि राघव या वर्षाच्या अखेरीस लग्नबंधनात अडकणार असल्याची सध्या चर्चा होत आहे. त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. पण ही जोडी लग्न सप्टेंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणीती लग्नात मनीष मल्होत्राने खास डिझाईन केलेला ड्रेस घालणार असल्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com