HBD Tejasswi Prakash: इंजिनियर होण्याचे स्वप्न पाहणारी तेजस्वी प्रकाश कशी झाली अभिनेत्री ? जाणून घ्या तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास

Tejasswi Prakash Career: तेजस्वीनीने मुंबई विद्यापीठातून इंजिनियरींगचे शिक्षण देखील पूर्ण केले आहे.
Tejaswi Prakash Birthday Celebration
Tejaswi Prakash Birthday Celebration Instagram @tejasswiprakash
Published On

Karan -Tejasswi Birthday Celebrations : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजस्वीने आपली वेगळीच ओळख तयार केली आहे. तेजस्वी ही अभिनेत्रीसोबतच इंजिनियरही आहे. तेजस्वी आज तिचा २९वा वाढदिवस साजरा करत आहे.

तेजस्वी प्रकाशचा जन्म १० जून १९९३ रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे झाला आहे. ती एका मराठमोळ्या कुटुंबात जन्माला आली आहे. तेजस्वीला खरी ओळख ही बिग बॉसमधून मिळाली. तेजस्वी ही बिग बॉसच्या १५ च्या पर्वाची विजेती आहे. बिग बॉसनंतर तिचे फॅन फॉलोविंग खूपच वाढले आहे.

तेजस्वी सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहमीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. तेजस्वी अजून एका गोष्टींमुळे नेहमी चर्चेत असते, ते म्हणजे तिचं रिलेशनशिप. तेजस्वी अभिनेता करण कुंद्रासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. तिच्या करणसोबतच्या पोस्ट नेहमीच व्हायरल होत असतात. बऱ्याचदा हे दोघे एकत्र स्पॉट होतात. (Latest Entertainment News)

Tejaswi Prakash Birthday Celebration
Kiara Spotted With Maa-Sasu Maa: लग्नानंतर आई आणि सासूसोबत पहिल्यांदाच दिसली कियारा; व्हिडिओ व्हायरल

इंजिनियरिंग ते अभिनेत्री हा प्रवास

तेजस्वीला इंजिनियरिंग बनण्याचे होते. तेजस्वीनीने मुंबई विद्यापीठातून इंजिनियरींगचे शिक्षण देखील पूर्ण केले आहे. अभ्यासासोबतच तेजस्वी नेहमीच अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. तिने 'मुंबई फ्रेश फेस' ही स्पर्धा जिंकल्यानंतर तिचे फोटाज् अनेक वर्तमानपत्रात आले होते आणि त्यानंतर तिचं आयुष्यचं बदललं.

तेजस्वी एका मराठमोळ्या कुटुंबात जन्माली आहे. लहानपणापासूनच ती संगीतमय वातावरण वाढली आहे. त्यामुळे संगीताशी तिचा जवळचा संबंध आहे. तेजस्वीचे वडिल प्रकाश वायंगणकर हे एक संगीतकार आहेत. अभिनयासोबतच ती गाणही खूप छान गाते.

Tejaswi Prakash Birthday Celebration
Satyaprem Ki Katha New Song Out: कार्तिक-कियाराच्या लग्नाचा थाट पाहिलात का ? 'सत्यप्रेम की कथा'मधील नवीन गाणे प्रदर्शित

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री ते बिग बॉस विजेती

तेजस्वीने मालिका विश्वातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ती '२६१२' या मालिकेतुन पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर ती संस्कार-धरोहर अपनो की, स्वरांगिनी, कर्ण संगिनी, सिलसिला बदलते रिश्तों का या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

तेजस्वी बिग बॉस १५ मध्ये सहभागी झाली होती आणि ती या पर्वीची विजेती देखील ठरली. बिग बॉसमधून ती नेहमीच तिच्या आणि करणच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत होती.

बिग बॉस नंतर तेजस्वी एकता कपूरच्या सर्वात मोठ्या मालिकेचा भाग झाली. 'नागिन' या मालिकेमुळे तिला आणखी प्रसिद्ध मिळाली. तेजस्वी प्रकाशने रोहित शेट्टी निर्मित'स्कूल कॉलेज आणि लाईफ' या चित्रपटातून मराठी चित्रपटात पदार्पण केले.

तेजस्वी प्रकाश बर्थ डे सेलिब्रेशन

तेजस्वीने काल रात्री तिच्या कुटुंबासोबत आणि बॉसफ्रेंड करण कुंद्रासोबत वाढदिवस साजरा केला . या वेळी ती लाल रंगाच्या वन पीसमध्ये खूप सुंदर दिसत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com