Satyaprem Ki Katha New Song Out: कार्तिक-कियाराच्या लग्नाचा थाट पाहिलात का ? 'सत्यप्रेम की कथा'मधील नवीन गाणे प्रदर्शित

Aaj Ke Baad Song: 'आज के बाद' हे सत्यप्रेम की कथा या चित्रपटातली नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे.
Satyaprem Ki Katha new song Aaj Ke Baad released
Satyaprem Ki Katha new song Aaj Ke Baad released Saam TV

Kartik Aaryan-Kiara Advani's New Song Released : कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांच्या 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. याच महिन्यात चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील कलाकार चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. चित्रपटातील नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

सत्यप्रेम की कथा चित्रपट कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या प्रेमावरआधारित आहे. सत्यप्रेम म्हणजे कार्तिक आणि कथा म्हणजे कियारा यांच्या लग्नच वेगळा सोहळा आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. (Latest Entertainment News)

Satyaprem Ki Katha new song Aaj Ke Baad released
Kiara Spotted With Maa-Sasu Maa: लग्नानंतर आई आणि सासूसोबत पहिल्यांदाच दिसली कियारा; व्हिडिओ व्हायरल

'सत्यप्रेम की कथा'मधील नवीन गाणे प्रदर्शित

'आज के बाद' हे सत्यप्रेम की कथा या चित्रपटातली नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात तुम्हाला कार्तिक खूप आनंदी दिसत आहे तर कियारा दुःखी दिसत आहे. कार्तिकचा डान्स देखील या गाण्यात पाहायला मिळत आहे. या गाण्यात कार्तिक आणि कियाराचे लग्न दाखविण्यात आले आहे. लग्नावर आधारित एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

मनन भारद्वाज आणि तुलसी कुमार यांनी हे गाणे गायले आहे. तर मनन यांनी हे गाणे लिहिले असून संगीतबद्ध देखील केले आहे. आज के बाद हे गाणे सायलेंट आहे. मनन आणि तुलसी यांनी हे गाणे खूप सुंदर गायले आहे. काही वेळच हे गाणे व्हायरल झाले आहे.

याआधी या चित्रपटातील नसीब से हे रोमँटिक गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्यालाही प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

कार्तिक आणि कियारा यांचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट २९ जूनला प्रदर्शित होणार आहे. कियारा आणि कार्तिकने भूल भूलैया २ मध्ये एकत्र काम केले होते. त्यांच्या हा चित्रपट हिट ठरला होता. कियारा - कार्तिकची जोडी प्रेक्षकांना आवडत आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल अशी आपण अपेक्षा करू शकतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com