Kiara Spotted With Maa-Sasu Maa: लग्नानंतर आई आणि सासूसोबत पहिल्यांदाच दिसली कियारा; व्हिडिओ व्हायरल

Satyaprem Ki Katha Pramotion: कियारा सासू आणि आई यांच्यासोबत प्रमोशनला जाताना स्पॉट झाली आहे.
Kiara Advani With Mother And Mother in Law
Kiara Advani With Mother And Mother in Law

Kiara Spotted On Satyaprem Ki Katha Set : 'सत्यप्रेम की कथा' हा कियारा आणि कार्तिकचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कियारा-कार्तिक याआधी 'भुल भुल्लैया २' या चित्रपटात एकत्र झळकले होते. सध्या कियारा - कार्तिक चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान कियारा सासू आणि आई यांच्यासोबत प्रमोशनला जाताना स्पॉट झाली आहे.

सासु-आईने प्रमोशनला उपस्थित राहून कियाराचं केलं कौतुक

कार्तिक-कियाराचा नवीन चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. त्याच्याच प्रमोशनमध्ये कियारा- कार्तिक व्यस्त आहेत. काल कियारा 'द कपिल शर्मा शो'च्या सेटवर दिसली होती. या शोमध्ये प्रमोशन करण्यासाठी कियारा तिच्या आई आणि सासूसोबत गेली होती. तिची आई गेनेविवे जाफरी आणि सासू रिमा मल्होत्रा तिला सपोर्ट करण्यासाठी द कपिल शर्माच्या सेटवर गेल्या होत्या. (Latest Entertainment News)

Kiara Advani With Mother And Mother in Law
Varun Tej - Lavanya Tripathi Photo: अखेर लावण्या त्रिपाठी - वरून तेजचा साखरपुडा पार पडला: फोटो व्हायरल

कियाराला फक्त चाहत्यांकडूनच नाहीतर घरातूनही पाठिंबा मिळत असल्याचे पुन्हा एकदा दिसले. त्यांच्या या फोटो आणि व्हिडिओवर चाहत्यांनी खूप छान कुंटुब, सगळे खूप सुंदर दिसत आहेत अशा कमेंट्स केल्या आहेत.

द कपिल शर्मा शोच्या प्रमोशन वेळी कियाराने गुलाबी रंगाची साडी आणि पांढऱ्या रंगाचा छान ब्लाउज घातला होता. कियारा या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिच्या फोटोंखाली चाहत्यांनी कमेंट करत तिच्या ब्युटीचे कौतुक केले आहे.

सत्यप्रेम की कथा

'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याचबरोबर सुप्रिया पाठक-कपूर, गजराज राव, अनुराधा पटेल, राजपाल यादव, निर्मिती सावंत, शिखा तलसानिया अशी तगडी कास्ट पाहायला मिळणार आहे. साजिद नाडियलवाला, शरिन मंत्री केडिया, किशोर अरोरा आणि समीर विंध्वस यांनी दिग्दर्शन केले आहे. 'सत्यप्रेम की कथा' चित्रपट २९ जूनला प्रदर्शित होणार आहे.

संपुर्ण तरुणाईला वेड लावणारी कियारा नेहमी चर्चेत असते. कियाराने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती सध्या तिच्या नवीन चित्रपट 'सत्यप्रेम की कथा'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com