Vidya Balan Birthday: आलिशान घर ते लग्जरी गाड्या; बॉलिवूडची 'परिणीता' आहे इतक्या कोटींची मालकीण

Vidya Balan Net Worth: आज बॉलिवूडच्या 'परिणीता'चा वाढदिवस आहे. अभिनेत्री विद्या बालन आता ४६ वर्षांची झाली आहे. तिने इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्या किती कोटींची मालकीण जाणून घ्या.
Vidya Balan Net Worth:
Vidya Balan BirthdaySAAM TV
Published On

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने (Vidya Balan) स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज विद्या 46 वर्षांची झाली आहे. विद्या बालनचा आज (1 जानेवारी)ला वाढदिवस (Birthday) आहे. विद्या बालनला बॉलिवूडमध्ये 'परिणीता' म्हणूनही ओळखले जाते. अलिकडेच अभिनेत्रीचा 'भूल भुलैया ३' प्रेक्षकांच्या भेटीला आला.

अभिनेत्री विद्या बालनचा जन्म केरळमध्ये झाला. मात्र तिचे बालपण मुंबईत गेले. विद्या बालनला तिच्या कामासाठी अनेक वेळा राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आजवर तिने अनेक हिट चित्रपट केले आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

विद्या बालन संपत्ती

विद्या बालनला 'परिणिती' चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. तुम्हारी सुलु आणि बेगम जान हे चित्रपट खूप हिट झाले आहेत. तिचा सर्वाच हिट झालेला चित्रपट म्हणजे अभिनेता अक्षय कुमारसोबतचा 'भूल भुलैया' (Bhool Bhulaiyaa 3) होय. विद्या बालन चित्रपटासोबत ब्रँडमधूनही कमाई करते. ती अनेक ब्रँडसोबत कनेक्ट आहे. तिच्याकडे लग्जरी गाड्या आणि आलिशान घर आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, विद्या बालन जवळपास 136 कोटींची मालकीण (Net Worth) आहे. तिचे तब्बल 14 कोटी रुपयांचे एक अपार्टमेंट आहे. तसेच तिचा एक फ्लॅट आहे, ज्याची किंमत 8 कोटी रुपये आहे. अभिनेत्री विद्या बालनकडे मर्सिडीज, सेडान यांसारख्या आलिशान गाड्या आहेत. विद्या बालनच्या चित्रपटासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.

Vidya Balan Net Worth:
Salman Khan : भाईजानने पार्टीत गायलं स्वतः चं २६ वर्ष जुनं गाणं; जामनगरमधील 'तो' VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com