
Most Popular Indian Movie of 2024: २०२४ मध्ये बॉलिवूडपासून मराठी आणि साऊथ इंडस्ट्रीपर्यंत अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. 'स्त्री २', 'सिंघम अगेन', 'भूल भुलैया ३' सारखे चित्रपट यशस्वी झाले. पण तुम्हाला माहीत आहे का या वर्षातील सर्वात लोकप्रिय चित्रपट कोणता? कदाचित 'स्त्री २' हे नाव तुमच्या मनात येत असेल, पण या वर्षातील सर्वात लोकप्रिय चित्रपटाचा किताब मिळवणारा चित्रपट वेगळाच आहे.
बुधवारी म्हणजे ११ डिसेंबर रोजी IMDb ने २०२४ मधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांची यादी जाहीर केली. यामध्ये प्रभासच्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.तर, दुसऱ्या क्रमांकावर राजकुमार राव-श्रद्धा कपूरचा 'स्त्री २' आहे. तसेच, विजय सेतुपती यांच्या 'महाराजा' चित्रपटाने तिसरे स्थान पटकावले आहे. यानंतर अजय देवगण आणि आर माधवनचा हॉरर चित्रपट 'शैतान' चौथ्या क्रमांकावर, तर हृतिक रोशनचा 'फायटर' चित्रपट पाचव्या क्रमांकावर आहे.
या चित्रपटांना देखील मिळाले यादीत विशेष स्थान
२०२४ च्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत मल्याळम चित्रपट 'मंजुम्मेल बॉईज'ला सहावे, 'भूल भुलैया ३'ने सातवे, राघव जुयाल-लक्ष्यच्या 'किल'ने ८वे आणि अजय देवगणच्या 'सिंघम'ने ९वे स्थान मिळाले आहे. तर, आमिर खानचा 'लपता लेडीज' हा चित्रपट १० व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, या यादीत दीपिका पदुकोणच्या तीन चित्रपटांचा समावेश आहे. ज्यात 'फाइटर', 'कल्की 2898 एडी' आणि 'सिंघम अगेन' यांचा समावेश आहे.
'कल्की 2898 एडी'ने १००० कोटींची कमाई केली
'कल्की 2898 एडी' हा २०२४ मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले होते आणि कथाही त्यांनीच लिहिली होती. प्रभास आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त अमिताभ बच्चन देखील या चित्रपटाचा महत्वाचा एक भाग होते. 'कल्की 2898 AD' या चित्रपटाने भारतासह संपूर्ण जगभरात १०४२.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.