Ranveer- Deepika : रणवीर-दीपिकाची मुलगी दुआ झाली तीन महिन्यांची, आजी अंजू भवनानीने दान केले स्वतःचे केस...

Ranveer- Deepika : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची मुलगी दुआ पदुकोण सिंग तीन महिन्यांची झाल्याच्या आनंदात रणवीरची आई अंजू भवनानीने केले दान केस.
Ranveer Deepika
Published On

Ranveer- Deepika : हिंदी चित्रपटसृष्टीतील पॉवरकपल अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची मुलगी दुआ पदुकोण सिंग ८ डिसेंबरला ३ महिन्यांची झाली. यावेळी, तिची आजी रणवीरची आई अंजू भवनानी यांनी तिच्या नातीसाठी "लव्ह आणि होप" चे जेश्चर म्हणून तिच्या तिसऱ्या महिन्याच्या वाढदिवशी एक खास गोष्ट केली आहे. त्यांची नात तीन महिन्यांची झाल्यावर त्यांनी केस दान केले आहे. या बातमीने त्या चर्चेत आल्या आहेत.

अंजूचे इंस्टाग्राम हँडल खाजगी असताना, एका पापाराझी अकाउंटने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. दुआच्या तिसऱ्या महिन्याच्या वाढदिवशी अंजूने तिच्या केसांचा एक भाग दान केल्याचे समोर आले आहे. पहिल्या चित्रात अंजू तिच्या दान केलेल्या केसांच्या चार वेण्या दाखवताना दिसली होती, ज्याच्या कॅप्शनमध्ये "दान केले" असे लिहिले आहे. तर, दुसऱ्या फोटोत, दान केलेल्या केसांच्या चार वेण्या हातात घेतलेल्या दिसत आहेत.

Ranveer Deepika
Sonu Nigam : सोनू निगमच्या शोमधून निघून गेले राजस्थानचे मुख्यमंत्री, म्हणाला जर तुम्ही थांबू शकत नसाल तर येऊ नका !

अंजू भवनानीने शेअर केली पोस्ट

तिसरा फोटो अंजूच्या डोक्याच्या मागच्या भागाचा होता ज्यात तिचे कापलेले केस दिसत होते. अंजूने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीत "हॅपी थर्ड मंथ बर्थडे माय डार्लिंग दुआ" असे कॅप्शन लिहून नातीसाठी प्रेमाशीर्वाद दिले आहेत. या कॅप्शनमध्ये पुढे अंजू लिहिते, आम्ही दुआ ३ महिन्याची होण्याचा आनंद साजरा करत आहोत. मला अशी आशा आहे की आमचा हे छोटंस बाळ चांगुलपणा आणि दयाळूपणाने कठीण काळातून जात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दिलासा आणि आत्मविश्वास देऊ शकेल.

Ranveer Deepika
Fussclass Dabhade : हळदी समारंभ उडणार ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटातील 'यल्लो यल्लो' गाण्याची धूम...

दीपिका पदुकोण मुलीसह मुंबईला परतली

दीपिका पदुकोण काही दिवसांपूर्वी बेंगळुरूमध्ये होती जिथे तिने गायक-अभिनेता दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला हजेरी लावली होती त्यानंतर दीपिका मुलगी दुआसोबत मुंबईला परतली. पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, दीपिका तिच्या लाडक्या लेकीला तिच्या मांडीवर घेऊन मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहे. ८ सप्टेंबर रोजी मुंबईत दुआला जन्म दिल्यानंतर आता दीपिका दिलजीतच्या बेंगळुरू कॉन्सर्टमध्ये स्टेजवर दिसली होती. दीपिकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, दीपिका शेवटची सिंघम अगेन या चित्रपटात दिसली होती. तर, रणवीर आदित्य धरच्या पुढील ॲक्शन थ्रिलर आणि फरहान अख्तरच्या गँगस्टर ड्रामा डॉन 3 मध्ये देखील दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com