Fussclass Dabhade : हळदी समारंभ उडणार ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटातील 'यल्लो यल्लो' गाण्याची धूम...

Fussclass Dabhade : फसक्लास दाभाडे या आगामी चित्रपटातील हळदी समारंभ 'यल्लो यल्लो' हे गाणं प्रदर्शित झाले आहे.
 Fussclass Dabhade : हळदी समारंभ उडणार ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटातील 'यल्लो यल्लो' गाण्याची धूम...
Fussclass Dabhade
Published On

Fussclass Dabhade : सध्या सगळीकडे लग्नसराईचा हंगाम सुरू असून लग्नातील हळदी समारंभ हा सर्वात खास आणि धमाल समारंभ असतो. याच धमाल वातावरणासाठी ‘फसक्लास दाभाडे’ या आगामी चित्रपटातील 'यल्लो यल्लो'हे गाणं एक नवा रंग घेऊन आलं आहे. नुकताच दाभाडे कुटुंबियांच्या घरातील हळदी सोहळा मोठ्या दणक्यात पार पडला.यानिमित्ताने 'यल्लो यल्लो' हे हळदीचे खास गाणंही प्रदर्शित करण्यात आले.

या सोहळ्यात दाभाडे कुटुंबाने एकत्र येऊन धमाल, मजामस्ती, नाचगाणी आणि विविध खेळ खेळत सोनू आणि कोमलचा हळदी समारंभ अगदी थाटामाटात साजरा केला. या हळदी समारंभाला हेमंत ढोमे, क्षिती जोग, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, निवेदिता सराफ, हरीश दुधाडे, राजन भिसे आणि राजसी भावे उपस्थित होते.

सोनू आणि कोमलच्या हळदी समारंभातील 'यल्लो यल्लो' गाण्यात धमाल पाहायला मिळत असून या गाण्याला अमितराज यांचे संगीत लाभले आहे. गाण्याचे बोल क्षितिज पटवर्धन यांचे असून या गाण्याने हळदी सोहळ्याचा उत्साह द्विगुणित केला आहे. या धमाकेदार गाण्यात नकाश अझीझ यांच्या आवाजाने अधिकच रंगत आणली आहे. सोनू आणि कोमलच्या हळदीचं हे गाणं प्रत्येकाला थिरकायला लावणारं आहे. ‘यल्लो यल्लो’ या गाण्यात हळदी समारंभातील धमाल क्षण पाहायला मिळत असून गाण्यात उत्साही वातावरणात कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा आनंद आणि मस्तीची झलक दिसतेय.

 Fussclass Dabhade : हळदी समारंभ उडणार ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटातील 'यल्लो यल्लो' गाण्याची धूम...
Sonu Nigam : सोनू निगमच्या शोमधून निघून गेले राजस्थानचे मुख्यमंत्री, म्हणाला जर तुम्ही थांबू शकत नसाल तर येऊ नका !

या चित्रपटातील गाण्याबद्दल मत व्यक्त करताना निर्माते भूषण कुमार म्हणतात, 'हे गाणं म्हणजे आमच्या तुमच्या घरातील लग्नातले चित्रण आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षक स्वतःमध्ये कुठेतरी शोधतील.खूप सुंदर असे सादरीकरण असून प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे गाणे आहे.’ तसेच, दिग्दर्शक हेमंत ढोमे या गाण्याबद्दल म्हणाले, 'हळद हा एक असा सोहळा असतो जिथे मस्ती, आनंद आणि नात्यांचे खेळ रंगतात. पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या सोहळ्याची धमाल ‘यल्लो यल्लो’ गाण्यात पहायाला मिळणार आहे… हे मराठमोळं कौटुंबिक सेलिब्रेशन पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.'

 Fussclass Dabhade : हळदी समारंभ उडणार ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटातील 'यल्लो यल्लो' गाण्याची धूम...
28 Years Later Trailer : भयानक सुरुवात, तितकाच भयंकर शेवट; 28 इअर्स लेटरचा ट्रेलर बघून थरकाप उडेल

टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांचा आगामी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. हेमंत ढोमे लिखित,दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत.तर,चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे. या चित्रपटात हेमंत ढोमे, क्षिती जोग, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, निवेदिता सराफ, हरीश दुधाडे, राजन भिसे आणि राजसी भावे आदी कलाकार मंडळी प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com