O Romeo Collection : 'व्हॅलेंटाईन डे'ला 'ओ रोमियो' चित्रपट हाउसफुल; २ दिवसांत केली 'इतक्या' कोटींची बक्कळ कमाई

O Romeo Box Office Collection Day 2 : 'ओ रोमिओ' चित्रपटाने 'व्हॅलेंटाईन डे'ला बक्कळ कमाई केली आहे. चित्रपट हाऊसफुल पाहायला मिळाला. दोन दिवसांत चित्रपटाने किती कमावले, जाणून घेऊयात.
O Romeo Collection
O Romeo Collection
Published On
Summary

'ओ रोमिओ' चित्रपट 13 फेब्रुवारी 2026 ला रिलीज झाला आहे.

'ओ रोमिओ' अ‍ॅक्शन-थ्रिलर आणि रोमँटिक चित्रपट आहे.

'ओ रोमिओ'मध्ये मुख्य भूमिकेत शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी झळकले आहेत.

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तावर रिलीज झालेला 'ओ रोमिओ' (O ROMEO) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने दोन दिवसांत 20 कोटींचा आकडा पार केला आहे. 'ओ रोमिओ' चित्रपट 13 फेब्रुवारी 2026 ला रिलीज झाला आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत झळकले आहेत. चित्रपटाने 'व्हॅलेंटाईन डे' ला किती कोटी कमावले जाणून घेऊयात.

'ओ रोमियो' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 2

'ओ रोमियो' चित्रपटाने पहिल्या शनिवारी (व्हॅलेंटाईन डे) ला बक्कळ कमाई केली आहे. Sacnilkच्या रिपोर्टनुसार, शाहिद कपूरच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 12.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केल आहे.

  • पहिला दिवस - 8.50 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 12.25 कोटी रुपये

  • एकूण - 20.75 कोटी रुपये

मीडिया रिपोर्टनुसार, 'ओ रोमियो'ने भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण 24.6 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. परदेशातून 2 कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर, चित्रपटाचे जगभरात एकूण 26.6 कोटी रुपयांचे कलेक्शन झाले आहे. 'ओ रोमियो' चित्रपटाचे बजेट जवळपास 120-150 कोटी रुपये आहे. 'ओ रोमियो' चित्रपटात शाहिद कपूर, तृप्ती डिमरीसोबतच नाना पाटेकर , रणदीप हुडा , दिशा पटानी हे कलाकार देखील झळकले आहेत. चित्रपट अ‍ॅक्शन-थ्रिलर आणि रोमँटिक चित्रपट आहे. 'ओ रोमियो' चे निर्माते विशाल भारद्वाज आहेत.

'ओ रोमियो'ने 'या' चित्रपटांना मागे टाकले

शाहिद आणि तृप्तीच्या 'ओ रोमियो' चित्रपटाने 2026 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हॅपी पटेल', 'राहु केतू', 'वध २', 'भाभीजी घर पर हैं' आणि 'तू या मैं' या चित्रपटांना मागे टाकले. मीडिया रिपोर्टनुसार, 'हॅपी पटेल'ने 6.2 कोटी, 'राहु केतू'ने 6.37 कोटी, 'भाभीजी घर पर हैं'ने 1.37 कोटी आणि 'तू या मैं'ने दोन दिवसांत 2 कोटी कमावले आहेत.

O Romeo Collection
Abhishek Bachchan : अमिताभ बच्चन यांचा लेक झाला मालामाल; अभिषेकने मुंबईतील लग्जरी फ्लॅट विकला, नफा वाचून हैराण व्हाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com