अभिषेक बच्चन अलिकडेच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होता.
अभिषेक बच्चनने आता मुंबईतील लग्जरी फ्लॅट विकला आहे.
अभिषेकला कोट्यवधींमध्ये नफा झाला आहे.
बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचा लेक अभिषेक बच्चन कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी चित्रपट तर कधी त्याचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत असते. मात्र आता अभिषेक बच्चन त्याच्या व्यवहारांमुळे चर्चेत आला आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनन मुंबईतील पॉश महालक्ष्मी परिसरातील त्याचे आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंट विकले आहे. अभिषेकला कोट्यवधींचा नफा झाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिषेक बच्चन यांनी आपला लग्जरी फ्लॅट तब्बल 14.5 कोटी रुपयांना विकला आहे. या हाय-प्रोफाइल विक्रीमुळे रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी चर्चा निर्माण झाली आहे, कारण सेलिब्रिटींनी केलेली मालमत्ता खरेदी आणि विक्री ही अनेकदा मोठी गुंतवणूक म्हणून पाहिली जाते. हा करार 12 फेब्रुवारी 2026 ला अधिकृतपणे नोंदणीकृत झाला आहे. हे आलिशान घर महालक्ष्मीमधील गोदरेज प्लॅनेटच्या टॉवर 4 च्या 40 व्या आणि 41 व्या मजल्यावर आहे.
मालमत्तेचा एकूण कार्पेट एरिया 2,249 चौरस फूट आणि याची किंमत प्रति चौरस फूट अंदाजे ₹64,473 आहे. या कराराचे वैशिष्ट्य म्हणजे ₹14.5 कोटींच्या या किमतीत खरेदीदारांना तीन कार पार्किंग स्लॉटसह अपार्टमेंट मिळते. महालक्ष्मी येथे स्थित गोदरेज प्लॅनेट हा मुंबईतील सर्वात प्रीमियम निवासी प्रकल्पांपैकी एक मानला जातो. पाच टॉवरच्या या मोठ्या इमारतीच्या प्रकल्पात 2,3 आणि 5 बीएचके अपार्टमेंटमध्ये 300 हून अधिक घरे आहेत. मात्र अद्याप अभिषेक बच्चनकडून या विक्रीबाबत कोणतेही अधिकृत माहिती समोर आली नाही.
रिअल इस्टेट मार्केटमधील बच्चन कुटुंबाच्या गुंतवणुकीच्या बातम्या वारंवार येत आहेत. त्यांनी विविध मालमत्ता वर्गात गुंतवणूक केली आहे. नवीन बंगले खरेदी करणे असो किंवा व्यावसायिक जागा असो किंवा जुन्या मालमत्ता विकणे असो. बच्चन कुटुंब स्मार्ट गुंतवणूक करताना दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.