Shreya Maskar
यंदा 15 फेब्रुवारी 2026 (रविवारी) महाशिवरात्री आली आहे. महाशिवरात्री भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळते. मुंबईतील प्रसिद्ध शंकराची मंदिरे जाणून घेऊयात.
बाबुलनाथ मंदिर हे मंदिर सुमारे 12व्या शतकातील शंकराचे प्राचीन मंदिर आह. गिरगाव चौपाटीजवळ टेकडीवर बाबुलनाथ मंदिर वसलेले आहे. महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यात हजारो भक्त येथे दर्शनासाठी येतात.
मालबार हिल परिसरात प्रसिद्ध वाळकेश्वर मंदिर आहे. मंदिराजवळ 'बाणगंगा तलाव' आहे. येथे शांत आणि पवित्र वातावरण असल्यामुळे ध्यान-पूजेसाठी भक्त येतात.
11व्या शतकातील हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधलेले अंबरनाथ शिव मंदिर हे अत्यंत कलात्मक आहे. मंदिराची भिंतीवरील शिल्पकला आणि रचना विशेष प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते.
अंधेरी येथे महाकाली मंदिर आहे. महाकाली येथे प्राचीन लेणी असून, येथे गुहांमध्ये भगवान शिवाची मंदिरे आहेत. महाशिवरात्रीला येथे भाविकांची गर्दी पाहायला मिळते.
ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध शिव मंदिर म्हणजे कोपिनेश्वर मंदिर होय. येथे असलेले विशाल शिवलिंग विशेष आकर्षण आहे. श्रावण सोमवार आणि महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणावर भक्त येतात.
मुंबईत अनेक महादेवाची मंदिरे आहेत. यात मार्कंडेश्वर मंदिर, घोडबंदर शिव मंदिर, तुळशीश्वर मंदिर, मंगलेश्वर मंदिर, बालकेश्वर मंदिर अशा अनेक मंदिरांचा समावेश आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.