Shreya Maskar
यंदा 15 फेब्रुवारी 2026 (रविवारी) महाशिवरात्री आली आहे. महाशिवरात्री आवर्जून थंडाई पितात. बाहेरची थंडाई पिण्यापेक्षा घरीच थंडगार केसर थंडाई बनवा. लहान मुल आवडीने खातील.
केसर थंडाई बनवण्यासाठी बदाम, काजू, पिस्ता, बिया, खसखस, वेलची, काळी मिरी, बडीशेप, खडीसाखर, केसर, गुलाबाच्या पाकळ्या आणि जायफळ पावडर इत्यादी साहित्य लागते.
केसर थंडाई बनवण्यासाठी एका ताटात बदाम, काजू, पिस्ता या ड्रायफ्रूट्सचे काप करून घ्या. तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार इतर ड्रायफ्रूट्स देखील मिक्स करू शकता.
त्यानंतर एका बाऊलमध्ये कापलेले ड्रायफ्रूट्स, बिया, खसखस, वेलची पावडर, काळी मिरी, थोडी बडीशेप, खडीसाखर, जायफळ पावडर मिक्स करून घ्या.
त्यानंतर यात थंडाईचे महत्त्वाचे घटक मिक्स करा. यात केसर, सुक्या गुलाबाच्या पाकळ्या मिक्स करा. गुलाबाच्या पाकळ्या एकदा काही सेकंदासाठी मिक्सरला लावा.
त्यानंतर आता सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्या, याची एक जाडसर पावडर तयार होईल. ही पावडर हवाबंद डब्यात जवळपास महिनाभर आरामात टिकेल.
आता शेवटी एक मोठा ग्लास घ्या. त्यात कोमट दूध मिक्स करा. त्यानंतर तयार केशर थंडाई पावडर मिक्स करून चांगली ढवळून घ्या. अशाप्रकारे केसर थंडाई ५ मिनिटांत तयार झाली.
केसर थंडाई पिताना त्यावर पुन्हा काजूचे काप आणि आवडीनुसार केशर टाका. थंडगार केसर थंडाई पिताच मन तृप्त होईल.