Nora Fatehi Viral Video : या एका व्हिडिओनं उडाली नोरा फतेहीच्या मृत्यूची अफवा; नेमकं काय आहे सत्य? वाचा

Nora Fatehi Death News: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या मृत्यूची अफवा पसरली आहे. एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती दरीत पडल्याचा दावा केला जात आहे.
Nora Fatehi
Nora Fatehiinstagram
Published On

Nora Fatehi: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. नोरा मरण पावली आहे अशी अफवा सोशल मिडीयावर पसरत आहे. एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला एका खोल दोरी बंजी जम्पिंग सारखा खेळ खेळताना दिसत आहे. या व्हिडिओबद्दल असा दावा केला जात आहे की ही महिला नोरा फतेही आहे.

एका इंस्टाग्राम यूजरने सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला आणि दावा केला की बॉलिवूडमधून वाईट बातमी येत आहे, नोरा फतेहीचे निधन झाले आहे! या व्हायरल व्हिडीओमध्ये, एक महिला झिप लाईनिंग करून माउंटन स्पोर्ट्स अ‍ॅक्टिव्हिटी करताना दिसत आहे. अचानक, झिप लाईन तुटते आणि ती एका खोल खड्ड्यात पडते. या व्हिडीओमध्ये महिलेचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. दरम्यान हा व्हायरल व्हिडीओ खोटा आहे.

Nora Fatehi
Santosh Juvekar : 'राजे एकटे आहेत'; 'छावा' चित्रपटातील प्रसंग सांगताना संतोष जुवेकर भावुक

चाहत्यांच्या कमेंटसना उधाण

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नोरा फतेहीच्या चाहत्यांना लगेच समजले की तो खोटा आहे. म्हणूनच त्याने पोस्टवरच आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एकाने लिहिले: 'नोराला माहित आहे का की ती मेली आहे?' दुसऱ्याने टिप्पणी दिली: “का? तुम्ही अफवा का पसरवत आहात? तर काही नेटकरी अशा खोट्या अफवा पसरवल्याबद्दल तक्रार करायला सांगत आहेत.

Nora Fatehi
Vicky Kushal: 'छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवतच'; विकी कौशलच्या अस्खलित मराठीने जिंकलं चाहत्यांचं मन

नोरा सोशल मिडीयावर सक्रिय

इकडे नोराच्या मृत्यूची अफवा पसरत आहे, तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री सोशल मिडीयावर सक्रिय आहे आणि पोस्ट शेअर करत आहे. तिचे 'स्नेक' हे नवीन गाणे नुकतेच रिलीज झाले आहे, ज्याचे प्रमोशन करण्यात ती सध्या व्यग्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com