Vicky Kushal: 'छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवतच'; विकी कौशलच्या अस्खलित मराठीने जिंकलं चाहत्यांचं मन

Vicky Kaushal Speaking Marathi: 'छावा' या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. एका मुलाखतीत विकीने चक्क मराठीत संवाद साधून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
Vicky kushal
Vicky kushalSaam Tv
Published On

Vicky Kushal: विकी कौशलचा 'छावा' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. ट्रेलरने चाहत्यांना थक्क केले आणि तेव्हापासून चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रोमोशन सुरु असताना एका मुलाखतीत विकीने चक्क मराठीत संवाद साधून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की विकी हा उत्तम मराठी बोलू शकतो आणि त्याच मराठी भाषेवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल फार आदर आणि प्रेम आहे.

या मुलाखतीत विकी कौशल मराठीत म्हणाला, माझा जन्म मुंबईत मालाडमध्ये झाला आहे. त्यानंतर मी अंधेरीला राहायला आलो. मी दहावी पर्यंत मराठी शाळेत शिकलो मला दहावीत मराठीत जास्त मार्क होते आणि इंग्रजीत कमी होते. मी लहानपणी ज्या मित्रांसोबत खेळलो ते मराठी होते. त्यामुळे मला थोडं मराठी बोलता येत पण पूर्ण समजत.

Vicky kushal
Priyanka Chopra: १००० करोडच्या चित्रपटासाठी प्रियांका चोप्राचे कोट्यवधींचे नुकसान; कारण ऐकून व्हाल थक्क

माझ्या मते जो व्यक्ती मुंबईत किंवा महाराष्ट्रात जन्माला आला आहे किंवा काम करतोय त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सगळं माहितीच असत. त्यांच्याविषयी सांगावं नाही लागत महाराज कोण होते.मग भलेही ते महाराष्ट्राबाहेरील असो. मी स्वतः पंजाबी आहे पण छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी पण दैवतच आहेत. असं नाही की त्यांच्या विषयी आम्हाला कोणी सांगितलं पण ते बाळकडू मिळालं आहे. मी जिथे राहायचो त्या सोसायटीमध्ये गेटसमोर शिवाजी महाराजांची मूर्ती होता ज्यावर असलेला हार रोज बदलायचा आणि आम्ही त्यांचा समोर क्रिकेट खेळलो आहोत. आता आम्हाला असे वाटते छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा संपूर्ण जगाला समजली पाहिजे.

Vicky kushal
Santosh Juvekar : 'राजे एकटे आहेत'; 'छावा' चित्रपटातील प्रसंग सांगताना संतोष जुवेकर भावुक

विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. ट्रेलरने चाहत्यांना थक्क केले आणि तेव्हापासून चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर, अक्षय खन्ना मुघल सम्राट औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाबद्दल मनोरंजक गोष्ट म्हणजे अलिकडेच हे उघड झाले की 'छावा'च्या संपूर्ण चित्रीकरणादरम्यान विकी आणि अक्षय यांनी कधीही एकमेकांशी बोलले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com