Priyanka Chopra: १००० करोडच्या चित्रपटासाठी प्रियांका चोप्राचे कोट्यवधींचे नुकसान; कारण ऐकून व्हाल थक्क

SSMB29 Priyanka Chopra: प्रियांका चोप्राच्या घरी सध्या तिच्या भावाच्या लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे. प्रियांकाने तिच्या भावाच्या लग्नासाठी एसएस राजामौली यांच्या 'एसएसएमबी२९' चित्रपटातून ब्रेक घेतला आहे.
Priyanka Chopra
Priyanka Chopra Instagram @priyankachopra
Published On

Priyanka Chopra: बॉलिवूड स्टार्स सध्या साउथचे चित्रपट आणि दिग्दर्शकांसोबत काम करण्यास पसंती दर्शवत आहेत. देसी गर्ल प्रियांका चोप्रा गेल्या अनेक दिवसांपासून भारतात आली आहे. तिचे भारतात येण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे एसएस राजामौली यांचा आगामी चित्रपट एसएसएमबी२९. या चित्रपटात महेश बाबू मुख्य भूमिकेत आहेत.तर, आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे प्रियांकाच्या भावाचे लग्न. यासाठी अभिनेत्रीने राजामौलीच्या चित्रपटातूनही ब्रेक घेतला आहे. 'SSMB29' चे बजेट १००० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे, परंतु या चित्रपटासाठी पीसीलाही कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागले आहे.

महिनाभराच्या चर्चेनंतर एसएस राजामौली यांनी प्रियांका चोप्राला त्यांच्या मोठ्या बजेटच्या चित्रपटासाठी राजी केले आहे. एवढेच नाही तर दिग्दर्शक 'SSMB29' साठी अभिनेत्रीला मोठी रक्कमही देत ​​आहे. माहितीनुसार, प्रियांका चोप्राने या साऊथ प्रोजेक्टसाठी तब्बल ३० कोटी रुपये आकारले आहेत. यासह, प्रियांका आता भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. पण पीसीने ३० कोटी रुपये आकारले असले तरी तिचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

Priyanka Chopra
Santosh Juvekar : 'राजे एकटे आहेत'; 'छावा' चित्रपटातील प्रसंग सांगताना संतोष जुवेकर भावुक

प्रियांका चोप्राने १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची कबुली दिली

खरंतर, प्रियांकाने बऱ्याच काळापासून हिंदी चित्रपटसृष्टीपासून अंतर ठेवले आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, पीसी हॉलिवूडच्या प्रकल्पांसाठी ५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ४० कोटी रुपये आकारते. अशा परिस्थितीत, ३० कोटी रुपयांना दक्षिण भारतीय चित्रपट करण्यास सहमती देऊन, तिचे १० कोटींचे नुकसान झाले हे आहे.

Priyanka Chopra
Abhishek Bachchan Net Worth: ज्युनियर बच्चन आहे करोडोंचा मालक; चित्रपटांव्यतिरिक्त 'या' कामातून करतो भरघोस कमाई

प्रियांका चोप्राचे मानधन दुप्पट झाले आहे.

यापूर्वीही प्रियांका चोप्रा हिंदी चित्रपटांसाठी १४ ते २० कोटींपर्यंत फी घेत असे. पण आता तिची फी दुप्पट झाली आहे. अशा परिस्थितीत, कमी मानधनात दक्षिण आणि बॉलिवूड चित्रपट करणे प्रियांकासाठी तोट्याचे ठरेल. दरम्यान, राजामौलीचा आगामी चित्रपट हा एक मोठा प्रकल्प आहे. हा चित्रपट सर्वात महागडा दक्षिण चित्रपट असल्याचेही म्हटले जात आहे, त्यामुळे प्रियांकाने कमी मानधनात तो करण्यास होकार दिला असावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com