Athiya-KL Rahul's Wedding Gifts:राहुल-अथियाला करोंडोंचे गिफ्ट्स; घर, लक्झरी कार, बाईक, घड्याळ अन् बरचं काही...

केएल राहुल आणि अथियावर गिफ्ट्सचा वर्षाव.
Athiya-KL Rahul Wedding Gifts
Athiya-KL Rahul Wedding GiftsSAAM TV

Athiya Shetty-KL Rahul's Luxurious Wedding Gifts: भारतीय प्रसिद्ध क्रिकेटपटू केएल राहुलने आणि बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी 23 जानेवारी लग्नबंधनात अडकले. गेली काही वर्ष दोघे एकमेकांना देत करत होते. केएल राहुल आणि अथिया यांचा वधूचे वडील ज्येष्ठ अभिनेता सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील 'जहान' निवासस्थानी पार पडला.

अथिया आणि राहुलच्या विवाह सोहळ्याला फक्त कुटुंबातील सदस्य आणि निवडक जवळचे मित्र उपस्थित होते. आमंत्रण असूनही केएल राहुलचे काही क्रिकेटर मित्र आणि सुनील शेट्टीच्या बीटाउन मित्रांना त्यांच्या लग्नाला हजार राहणे शक्य झाले नाही.

Athiya-KL Rahul Wedding Gifts
Pathan 1st Day Collection : शाहरुखचं दमदार कमबॅक, 'पठान'ची पहिल्याच दिवशी रेकॉर्डतोड कमाई; 'KGF'लाही टाकलं मागे

मिळालेल्या वृत्तानुसार विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यासह क्रिकेट क्षेत्रातील केएल राहुलचे जवळचे मित्र एकदिवसीय मालिकेत व्यस्त असल्याने लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत. कोहलीने त्याच्या प्रिय मित्राला, रु. 2.70 कोटी किमतीची बीएमडब्ल्यू कारचे नवीन मॉडेल भेट देऊन आश्चर्यचकित केले. एम एस धोनीने केएल राहुलला रु. 80 लाख किमतीची कावासाकी निन्जा बाईक लग्नाची भेट म्हणून पाठवली आहे.

सुनील शेट्टीच्या बॉलीवूडमधील मित्र मंडळींनी सुद्धा अथिया आणि केएल राहुलला भेटवस्तू पाठवल्या आहे. सुपरस्टार सलमान खान आणि ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी लग्नाला उपस्थित नसतानाही अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांना लग्नाच्या भेटवस्तू पाठवल्या आहेत. सलमान खानने नवविवाहित जोडप्याला ऑडी कार भेट दिली, तर श्रॉफने त्यांना महागडे घड्याळ देऊन आश्चर्यचकित केले.

वधूचे पालक सुनील शेट्टी आणि माना शेट्टी यांनी नवविवाहित जोडप्याला दिलेल्या एक खास गिफ्ट दिले आहे. सुनील शेट्टी आणि त्याच्या पत्नीने मुलगी अथिया आणि जावई केएल राहुल यांना मुंबईच्या मध्यभागी सुमारे रु. ५० करोड किमतीचे घर भेट दिले आहे.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी दोघेही व्यस्त असल्यामुळे त्यांचे रिसेप्शन अद्याप झालेले नाही. तसेच आयपीएल नंतर त्यांचे रिसेप्शन होईल अशी माहिती आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com