Vijay Varma - Tamannaah Bhatia Relationship : वहिणी कुठे आहे ? विजय वर्माच्या पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केली तमन्ना

Vijay Varma Solo Trip : विजयने या ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
Vijay Varma Solo Trip Photo
Vijay Varma Solo Trip PhotoInstagram @itsvijayvarma
Published On

Netizens Ask Vijay Varma About Tamannaah Bhatia : तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा सर्वत्र ट्रेंड करत आहेत. लस्ट स्टोरी २ हा त्यांच्या आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या चित्रपटाची तर चर्चा आहेच, त्याचबरोबर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची देखील सोशल मीडियावर चर्चा आहे. विजय वर्माच्या सोलो ट्रिपने या कपलच्या चर्चांमध्ये अजूनच भर घातली आहे. विजयच्या पोस्टवरील नेटकऱ्यांच्या अतरंगी कमेट्सने लक्ष वेधून घेतले आहे.

विजय वर्मा आणि तमन्ना भाटियाच्या गोव्यातील न्यू इयर सेलिब्रेशन व्हिडिओमुळे त्यांच्यातील नात्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यांचा किस करतानाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता या दोघांनीही त्यांच्या नात्याचा स्वीकार केला आहे. त्यांचे नाते आता जगजाहीर झाले आहे. नुकताच विजय वर्मा किर्गीस्तान येथील राष्ट्रीय उद्यानात फिरायला गेला आहे.

Vijay Varma Solo Trip Photo
Bigg Boss OTT 2 Updates : सलमान खानला प्रेमात मिळाला धोका ; बेबीका धुर्वेचा मोठा खुलासा

विजयने या ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. विजय या ट्रिपला त्याच्या मित्रांसोबत गेला आहे. तसेच सुरुवातीच्या काही फोटोंमध्ये तो एकटाच दिसत आहे. विजयसोबत तमन्ना न दिसल्याने नेटकऱ्यांनी अभिनेत्रींविषयी विचारण्या सुरुवात केली आहे.

या फोटोंमध्ये विजय निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवताना दिसत आहे. फोटोमध्ये विजयच्यामागे हिरवेगार डोंगर दिसत आहे. फोटोत विजयने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, निळ्या रंगाची जीन्स आणि शूज घातले आहे. विजयच्या या पोस्टवर गर्लफ्रेंड तमन्नानेही लाईक केले आहे.

विजयच्या या पोस्टवर चाहत्यांनी मात्र भन्नाट कमेंट्स केल्या आहे. नेटकऱ्यांच्या कमेंट्समुळे हे कपल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 'वहिणी कुठे आहे?' अशी थेट कमेंट एका नेटकाऱ्याने विजयच्या पोस्टवर केली आहे. तर दुसऱ्या नेटकाऱ्याने म्हटलं आहे, "यहा घुमने की मेरी भी तमन्ना है" (Latest Entertainment News)

विजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, विजय आणि तमन्ना ही जोटी पहिल्यांदा 'लस्ट स्टोरी २' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यादी विजय आलिया भटसोबत डार्लिंगजमध्ये दिसला होता.

विजय आणि तमन्ना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. तमन्नाने विजयला तिची हॅपी प्लेस म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com