Bollywood celebrities threat by gangsters : दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावर मध्यरात्री धाडधाड गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामध्ये कुणीही जखमी अथवा मृत्यू झाला नाही. पण पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेत कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात पुण्यातून ४ जणांना बेड्या ठोकल्या. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. फक्त रोहित शेट्टीच नाही तर बॉलिवूडमधील ५ मोठे स्टार्स गँगस्टरच्या निशाण्यावर आहेत. गँगस्टरकडून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना खंडणीसाठी फोन आलेले आहेत. या प्रकरणानंतर बॉलिवडूमध्ये भीतीचे वातावरण आहे. गँगस्टरच्या निशाण्यावर अख्खं बॉलिवूड असल्याचा म्हटले जातेय. पोलिसांच्या तपासात नेमकं काय समोर आले पाहूयात...
रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. या तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती गातात लागली. तुरुंगात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या वतीने काम करणाऱ्या फरार गँगस्टर शुभम लोणकर याचा या प्रकऱणात सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलेय. लोणकर याच्या सहकाऱ्यांकडून बॉलिवूडमधील ५ मोठ्या स्टार्सला खंडणीसाठी फोन आले असल्याचे पोलिसातील सूत्रांनी सांगितले. पण अद्याप एकाही कलाकाराने याबाबत पोलिसात तक्रार केलेली नाही.
रविवारी पहाटे चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावर काही अज्ञात व्यक्ती ६ राऊंड फायर केल्या. या गोळीबाराच्या घटनेची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी या घटनेबाबत धक्कादायक खुलासे केले. ते म्हणाले की, धमकी आलेले काही सेलिब्रिटी पोलिसांत तक्रार करण्यास उत्सुक नाहीत. रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार का करण्यात आला? याचं कोणतेही कारण अद्याप समोर आलेले नाही फक्त बॉलिवूडमध्ये भीती निर्माण करण्यासाठी ही घटना घडली असावी.
गँगस्टर शुभम लोणकर याने बॉलिवूडमधील ५ सेलिब्रिंटींना खंडणीसाठी फोन केले असल्याचा अंदाज पोलिसांच्या सूत्रांनी व्यक्त केला. धक्कादायक म्हणजे, या पाच कलाकारांपैकी एक जणही पोलिसात तक्रार देण्यास पुढे आला नाही. गुप्तचर माहितीमध्ये अनेक धमकीचे फोन येत असताना तक्रारीसाठी कुणीही पुढे का येत नाही, असे एका पोलिसाने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. या प्रकरणाचा पोलीस स्वत: तपास करतील, अन् कारवाई करतील, हे अत्यंत कठीण असल्याचेही पोलिस अधिकाऱ्याने म्हटलेय. रोहित शेट्टी यांनीही धमकीचा फोन आला हे सांगितले नाही.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा जोडीदार असलेला गँगस्टर लोणकर याने सोशल मीडियावर पोस्ट करत रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. लोणकर याच्या पोस्टवरून रोहित शेट्टीला वारंवार धमकीचे फोन आल्याचे उघड होतेय. पण रोहित शेट्टी याच्याकडून याबाबत कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.