सध्या भारतीय स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांच्या घटस्फोटाचे प्रकरण चर्चेत आहे. घटस्फोटानंतर त्यांना नुकसानभरपाई म्हणून किती रक्कम द्यावी लागेल, याबाबतही या चर्चा सुरू आहेत. मात्र तु्म्हाला माहिती आहे का? क्रिकेट जगतातील सर्वात महागडा घटस्फोट २० वर्षांपूर्वी झाला होता. ज्यामध्ये एका दिग्गज क्रिकेटरला १०० कोटी रुपये मोजावे लागले होते.
क्रिकेट जगतात गेल्या २० वर्षात ज्या क्रिकेटपटूचा (cricketer)घटस्फोट झाला, त्यात शेन वॉर्न, मोहम्मद अझरुद्दीन, शिखर धवन, शोएब मलिक, दिनेश कार्तिक, केविन पीटरसन, ग्रॅमी स्मिथ, इम्रान खान, विनोद कांबळी, मायकल क्लार्क यांसारखे दिग्गज आहेत शिवाय सनथ जयसूर्या याचा देखिल सहभाग आहे.
तर सर्वात महाग घटस्फोटात अडकलेला खेळाडू आहे ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न. २००५ मध्ये त्याचा घटस्फोट झाला होता. कॅलहानने त्याची अनेकवेळा फसवणूक केली आणि त्यानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दोघांचे लग्न(married) केवळ दहा वर्षे टिकले. तोपर्यंत शेन वॉर्न आणि सायमन यांना तीन मुले झाली होती.
आता आपण शेन वॉर्न पाठोपाठ झालेल्या जगातील हाय-प्रोफाइल आणि महागड्या घटस्फोटांची आणखी काही उदाहरणे पाहुया. यात पहिले नाव आहे,
1. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक
टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकने पाकिस्तानी टीव्ही अभिनेत्री सना जावेदसोबत तिसरे लग्न केले आहे. सानिया मिर्झाची एकूण संपत्ती २१६ कोटी रुपये आहे, तर शोएब मलिकची एकूण संपत्ती २३० कोटी रुपये आहे. यामुळे त्यांचा घटस्फोट क्रीडा (Sports) जगतातील सर्वात हाय-प्रोफाइल घटस्फोटांपैकी एक आहे.
2. अंबर हर्ड आणि जॉनी डेप
हॉलिवूडचे माजी जोडपे एम्बर हर्ड आणि जॉनी डेप यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी बरीच चर्चा रंगली होती. या जोडप्याचा घटस्फोट हा बातम्यांमधील सर्वात मोठा घटस्फोट होता आणि त्यांनी बरेच लक्ष वेधले.२०१६ मध्ये, अंबर हर्डने जॉनी डेपपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला, ज्यासाठी तिला घटस्फोटाचा तोडगा म्हणून ७० लाख डॉलर मिळाले.
3. शेख मोहम्मद बिन रशीद अल-मकतूम आणि राजकुमारी हया बिंत अल-हुसेन
दुबईचे सत्ताधारी शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल-मकतूम यांनी डिसेंबर २०२१ मध्ये त्यांची माजी पत्नी राजकुमारी हया बिंत अल-हुसेन हिला घटस्फोट (Divorce)दिला आणि त्यांना $७२८ दशलक्ष देण्यास सांगण्यात आले! त्यांचा घटस्फोट सोपा नव्हता कारण शेख मोहम्मद यांच्यावर कथित अफेअर आणि धमक्यांचा आरोप होता आणि घटस्फोटाला अनेक वर्षे लागली.
4. बिल गेट्स आणि मेलिंडा फ्रेंच गेट्स
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि परोपकारी बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांचा २७ वर्षांच्या दीर्घकाळानंतर ३ मे २०२१ रोजी घटस्फोट झाला. न्यायालयाच्या कागदपत्रांमध्ये माजी जोडप्याचा खाजगी घटस्फोटाचा करार होता. त्यांच्या घटस्फोटानंतर जोडप्याने जगभरातील मदतीसाठी गेट्स फाउंडेशन नावाचे त्यांचे फाउंडेशन चालवण्याचा निर्णय घेतला. गेट्स फाऊंडेशनची किंमत ४० अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे.
5. जेफ बेझोस आणि मॅकेन्झी स्कॉट
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि Amazon चे संस्थापक-CEO जेफ बेझोस यांनी एप्रिल २०१९ मध्ये त्यांची पत्नी मॅकेन्झी स्कॉटसोबत २५ वर्षांचे लग्न संपल्याची घोषणा केली होती. जून २०१८ मध्ये जेफ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता आणि २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांचा घटस्फोट निश्चित झाल्यानंतर जेफने मॅकेन्झीला ३६ अब्ज डॉलर दिले ज्यामुळे मॅकेन्झी जगातील सर्वात श्रीमंत (Rich )महिलांपैकी एक बनली.
Edited By: Tanvi Pol
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.