Hardik- Natasa Divorced: हार्दिक पंड्याच नव्हे तर या खेळाडूंचाही झालाय घटस्फोट! पाहा संपूर्ण यादी

Indian Cricketers Who got divorced : भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोव्हिक यांचा घटस्फोट झाला आहे.
hardik pandya natasa stankovik
hardik pandya natasa stankoviksaam tv
Published On

भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या सध्या चर्चेचा विषय ठरतोय. निमित्त ठरतंय नताशा आणि हार्दिक यांचा घटस्फोट. ४ वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दोघांनी मिळून घेतला, असून हा निर्णय घेणं खूप कठीण होतं,असं हार्दिकने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान हार्दिक पंड्या हा एकमेव क्रिकेटपटू नाही, ज्याचा घटस्फोट झालाय. तर याआधी देखील काही क्रिकेटपटू होऊन गेले ज्यांचा घटस्फोट झाला आहे. कोणे आहेत ते क्रिकेटपटू? जाणून घ्या.

hardik pandya natasa stankovik
IND vs SL, Team India: ऋतुराजला डच्चू तर हार्दिकची उप कर्णधारपदावरुन सुट्टी! BCCI ने घेतले हे 5 'गंभीर' निर्णय

शिखर धवन- आयशा मुखर्जी

भारताचा डावखुरा फलंदाज शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांचा २००९ मध्ये साखरपुडा झाला होता. त्यानंतर २०१२ मध्ये दोघेही विवाह बंधनात अडकले होते. दोघेही ११ वर्ष एकत्र राहिले. त्यानंतर ११ वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. २०२३ मध्ये धवनने आयशाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. (How many cricketers divorced in india)

दिनेश कार्तिक-निकिता बंजारा

भारताचा स्टार क्रिकेटपटू दिनेश कार्तिक आपल्या मैदानावरील कामगिरीसह लव्ह लाईफमुळेही चर्चेत राहिला. २००७ मध्ये तो निकिता बंजारासोबत विवाह बंधनात अडकला होता. त्यानंतर २०१२ मध्ये त्याला समजलं की, निकिता आणि मुरली विजय यांच्यात जवळीक वाढली आहे. त्यावेळी त्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.

hardik pandya natasa stankovik
Team India Captain: ना हार्दिक,ना सूर्या; शुभमन गिल होणार भविष्यातील कर्णधार! ही आहेत प्रमुख कारणं

मोहम्मद शमी -हसीन जहान

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी २०१४ मध्ये विवाह बंधनात अडकला होता. २०१८ मध्ये त्याची पत्नी हसीन जहानने त्याच्यावर आरोप करायला सुरुवात केली. तेव्हापासून ते वेगेळे राहत आहेत. हे प्रकरण न्यायालयात असून आतापर्यंत निकाल लागु शकलेला नाही. दोघांना एक मुलगी असून, ती मुलगी आपल्या आईसोबत राहते.

अनिल कुंबळे- एला लुईस

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे हे एला लुईससोबत विवाह बंधनात अडकले होते. काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्याच्यांवर लैंगिक छळ करण्याचा आरोप करण्यात आला. या आरोपानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचं ठरवलं.

मोहम्मह अजहरुद्दीन- नौरीन

भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मह अजहरुद्दीन यांचा एकदा नव्हे तर दोनदा घटस्फोट झाला आहे. त्यांनी १९९६ मध्ये नौरीनला घटस्फोट देत अभिनेत्री संगीता बिजलानीशी विवाह केला. त्यानंतर त्यांच्यावर आरोप झाले आणि दुसरं लग्नही मोडलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com