Actress Father Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; हक्काचा माणूस गमावला

Lara Dutta Father Passes Away: बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स २००० विजेती लारा दत्ता यांचे वडील, निवृत्त विंग कमांडर एल. के. दत्ता यांचे ३१ मे २०२५ रोजी मुंबईत निधन झाले.
Lara Dutta Father Passes Away
Lara Dutta Father Passes AwaySaam Tv
Published On

Lara Dutta: बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स २००० विजेती लारा दत्ता यांचे वडील, निवृत्त विंग कमांडर एल. के. दत्ता यांचे ३१ मे २०२५ रोजी मुंबईत निधन झाले. त्यांचे वय ८४ होते. या दु:खद प्रसंगानंतर लारा दत्ता आणि त्यांचे पती, टेनिसपटू महेश भूपती, मुंबईतील सांताक्रूझ हिंदू स्मशानभूमीत झालेल्या त्यांच्या अंतिम संस्कारासाठी उपस्थित होते .

लारा दत्ता आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पांढऱ्या पारंपरिक पोशाखात अंतिम संस्कारात सहभाग घेतला. यावेळी अभिनेत्रीचे अश्रू अनावर झाले . तिच्या वडिलांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आणि तिच्या कुटुंबीयांना या कठीण काळात धीर दिला आहे.

Lara Dutta Father Passes Away
Actress Passes Away: एमी पुरस्कार विजेती प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन; वयाच्या ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लारा दत्ताने यापूर्वी तिच्या वडिलांबद्दल बोलताना सांगितले होते की, तिच्या वडिलांनी भारतीय हवाई दलात विंग कमांडर म्हणून सेवा केली होती. त्यांनी तीन युद्धांमध्ये भाग घेतला होता आणि त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर कुटुंबासोबत बेंगळुरूमध्ये स्थायिक झाले होते .

Lara Dutta Father Passes Away
Tiger Man Passes Away: भारताचे 'टायगर मॅन' वाल्मीक थापर यांचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

१२ मे २०२५ रोजी, त्यांच्या वडिलांच्या ८४व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, लारा दत्ताने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने लिहिले "माझ्यासाठी १२ मे, माझ्या आयुष्यातील एक खास दिवस. माझ्या वडिलांचा वाढदिवसच नाही तर २५ वर्षांपूर्वी मी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता तो दिवसही. वेळ खूप वेगाने जातो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com