
चित्रपट प्रत्येकाचा आवडता विषय आहे. प्रेक्षक आपल्या आवडत्या कलाकाराचा चित्रपट रिलीज होणार म्हटल्यावर आवर्जुन पाहायला जातातच. नुकतंच आपण सर्वांनी २०२३ या वर्षाला निरोप देत, २०२४ या वर्षाचं धुमधडाक्यात स्वागत केलं आहे.
खरंतर, २०२३ हे वर्ष मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी खास ठरलं. 'वेड' आणि 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली होती. २०२४च्या पहिल्याच आठवड्यामध्ये एकूण तीन चित्रपट रिलीज होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहायला मिळणार आहेत. (Marathi Film)
२०२४ या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची नांदी पाहायला मिळणार आहे. येत्या (शुक्रवारी) ५ जानेवारी माधुरी दीक्षितचा 'पंचक', नाना पाटेकर, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकरचा 'ओले आले' तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित असलेला 'सत्यशोधक' चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहेत. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट हिट ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Latest News)
राहुल आवटे दिग्दर्शित 'पंचक' चित्रपट येत्या ५ जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, गणेश मयेकर सह इत्यादी स्टारकास्ट दिसणार आहे. घरात पंचक लागल्यामुळे कोणाचा नंबर लागणार याची सर्वांनाच भीती असते. खोतांच्या घराला लागलेले 'पंचक' कसे सुटणार ? बघताना मजा येणार हे नक्की. डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने यांनी चित्रपटाची निर्मिती केली.
सिद्धार्थ चांदेकर, नाना पाटेकर, सायली संजीव आणि मकरंद अनासपुरे मुख्य भूमिकेत असलेले 'ओले आले' चित्रपट येत्या ५ जानेवारीला रिलीज होतोय. हे चौघेही सहलीमध्ये काय धम्माल मस्ती करणार? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत्या ५ जानेवारी मिळणार आहे.
अभिनयाचे आणि विनोदाचे चौकार आणि षट्कार मारणारे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे ही जोडी पुन्हा एकदा चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंची ही जोडी 'ओले आले' मधून नक्कीच मनसोक्त हसवेल यात काही शंका नाही. चित्रपटातून आपल्याला नाना आणि मकरंद अनासपुरे काय कानमंत्र देणार औत्सुक्याचे ठरणार आहे.
समाजात महिलांना मानाचा स्थान मिळावं यासाठी ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांनी खूप कष्ट सोसले. त्यांच्यामुळे स्त्रिया शिकल्या आणि आज समाजात मानाने वावरत आहेत. स्त्रियांना मानाने जगायला लावणारे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ चित्रपट येत्या ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी या चित्रपटाला गौरवण्यात आले. संदीप कुलकर्णींसह राजश्री देशपांडे, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी हे कलाकार मंडळी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.