Nana Patekar Birthday: रुपेरी पडद्यावरील 'नटसम्राट' स्वत:चे चित्रपट पाहत नाहीत; स्वतः नाना पाटेकरांनी सांगितलं कारण

Nana Patekar Turns At 73 Age: भारतीय सिनेसृष्टीमध्ये प्रगल्भ अभिनेते म्हणून ओळखले जाणाऱ्या नाना पाटेकर यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म १ जानेवारी १९५१ ला झाला असून ते आज आपला ७३ वा वाढदिवस साजरा करीत आहेत.
Nana Patekar Birthday
Nana Patekar BirthdaySaam Tv
Published On

Nana Patekar Life Interesting Facts

भारतीय सिनेसृष्टीमध्ये प्रगल्भ अभिनेते म्हणून ओळखले जाणाऱ्या नाना पाटेकर यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म १ जानेवारी १९५१ ला झाला असून ते आज आपला ७३ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. एक उत्तम अभिनेता आणि कायमच सामाजिक विषयांवर रोखठोक विषय मांडणारा अभिनेता म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला असून आज नानांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयीच्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊया... (Bollywood Actor)

Nana Patekar Birthday
Arbaaz Khan ने गुडघ्यावर बसून Sshura Khan ला केला प्रपोज, लग्नाच्या ५ दिवस आधीचा VIDEO व्हायरल

नाना भारतीय सिनेसृष्टीमध्ये, ४० वर्षांहून अधिक काळ सक्रिय आहेत. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीत ६५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नानांना आपल्या सिनेकारकिर्दित बेस्ट ॲक्टर आणि बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरचा नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. तर नानांना अनेक कॅटेगरीमध्ये फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. १९७८ मध्ये 'गमन' चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले आहे. नाना पाटेकर यांनी हिंदी चित्रपटासोबतच मराठी, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि मल्याळम या भाषेतील चित्रपटामध्ये काम केले आहे. (Bollywood Film)

दोन वेळच्या जेवणासाठी कष्ट

नाना पाटेकर यांचं खरं नाव विश्वनाथ पाटेकर असं आहे. एक यशस्वी अभिनेता होण्यासाठी नाना पाटेकर यांना खूप संघर्ष करावा लागला होता. त्यांना दोन वेळचे जेवण मिळण्यासाठी त्यांना फार कष्ट करावे लागले होते. घर चालवण्यासाठी नानांनी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी काम करायला सुरुवात केली होती. मुंबईतल्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स या इन्स्टिट्यूटमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन दिवसामध्ये नाना यांनी नाटकांत काम केले होते. नानांना स्केचिंगची आवड असल्यामुळे गुन्हेगारांची ओळख पटवून देण्यासाठी नाना मुंबई पोलिसांना स्केच बनवून द्यायचे. (Nana Patekar)

Nana Patekar Birthday
Mann Ki Baat: फिटनेस 2 मिनिटांची मॅगी किंवा काफी..., अक्षय कुमारने 'मन की बात'मध्ये सांगितला फिटनेस मंत्रा

नाना पाटेकर यांची सिनेसृष्टीतील कारकिर्द

नानांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यापूर्वी नाटकांमध्ये काम केले होते. त्यानंतर त्यांनी चित्रपटामध्ये काम करण्यास सुरुवात केली. कोणत्याही धाटणीची भूमिका असो, नाना अगदी लीलया रुपेरी पडद्यावर साकारायचे.

आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यांनी उत्कृष्ट भूमिका मिळवल्या आहेत. निगेटिव्ह, कॉमेडी आणि हिरो अशा सर्व प्रकारच्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. 'गिड्ड', 'अंकुश', 'प्रहार', 'प्रतिघाट' यांसारख्या त्यांच्या हिट चित्रपटांचा समावेश आहे. नानांना आपल्या सिनेकारकिर्दित १९८६ मध्ये रिलीज झालेल्या 'अंकुश' चित्रपटातून चांगलीच प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात नानांनी एका बेरोजगार तरुणाची भूमिका साकारली होती. (Latest Marathi News)

Nana Patekar Birthday
Kedar Shinde: तुझा मी ऋणी आहे पण फक्त एकच विनंती..., २०२३ च्या शेवटी केदार शिंदेंची भावनिक पोस्ट चर्चेत

स्वतःचा चित्रपट कधीच पाहत नाही- नाना पाटेकर

आपल्या ४० वर्षांहून अधिकच्या फिल्मी कारकिर्दीत खलनायकापासून ते विनोदी भूमिकेपर्यंत त्यांनी सर्वच भूमिका अगदी लीलया पार पाडल्या. कोणतीही भूमिका असो, आपला जीव ओतून ती भूमिका जागवणे हे नानांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य आहे.

एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी सांगितले होते की, "जो पर्यंत माझा दिग्दर्शकावर विश्वास बसत नाही, तोपर्यंत मी स्वतःला दिग्दर्शकाच्या हवाली करत नाही. मी स्वतःचे चित्रपट कधीही बघत नाही, एकदा का त्याचं डबिंग झालं की माझं काम संपतं. त्यातल्या कोणत्याही गोष्टी मला आकर्षित करत नाहीत. इच्छा असून देखील मी चित्रपटामध्ये काहीही बदल घडवू शकत नाही. जर मी त्या चित्रपटाचा दिग्दर्शक असेल तरच त्या चित्रपटाशी शेवटपर्यंत निगडीत राहतो." (Entertainment News)

Nana Patekar Birthday
Aastad Kale Mother Death: ...म्हणुनी घनव्याकुळ मी रडलो नाहीये अजून, आईच्या निधनानंतर आस्ताद काळेची भावुक पोस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com