Arbaaz Khan ने गुडघ्यावर बसून Sshura Khan ला केला प्रपोज, लग्नाच्या ५ दिवस आधीचा VIDEO व्हायरल

Arbaaz Khan And Sshura Khan Wedding: अरबाज खान आणि शूरा खानचा एक अनसिन व्हिडीओ समोर आला आहे. जो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अरबाज खान शूराला लग्नासाठी प्रपोज करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
Arbaaz Khan Propossed To Sshura Khan
Arbaaz Khan Propossed To Sshura KhanSaam Tv
Published On

Arbaaz Khan Propossed To Sshura Khan:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अरबाज खानने (Arbaaz Khan) २४ डिसेंबरला दुसरं लग्न केलं. अरबाज खानने मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत(Sshura Khan) निकाह करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. अरबाज आणि शूराच्या निकाहला (Arbaaz Khan And Sshura Khan Wedding) दोघांच्याही कुटुंबातील सदस्य आणि जवळचा मित्र परिवार उपस्थित होता. या कपलच्या निकाहचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले. लग्नानंतर देखील हे कपल चांगलेच चर्चेत आले. आता अरबाज खान आणि शूरा खानचा एक अनसिन व्हिडीओ समोर आला आहे. जो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

अरबाज खानची बायको मेकअप आर्टिस्ट शूरा खानने स्वतः आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये अरबाज तिला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अरबाजची बहीण अर्पिता आणि मुलगा अरहानही दिसत आहे. अरबाज खानने लग्नाच्या ५ दिवसांपूर्वी शूराला प्रपोज केल्याचा हा व्हिडीओ आहे. एका क्लबमधील पार्टी दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. अरबाज खान शूराला भलामोठा फुलगुच्छ देतो. त्यानंतर गुडघ्यावर बसून शूराला लग्नासाठी प्रपोज करत तो तिच्या हातामध्ये अंगठी घालतो. या व्हिडीओमध्ये शूरा खूपच लाजताना दिसत आहे.

शूरा खानने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, '19 तारखेला हो म्हणण्यापासून ते 24 डिसेंबरला लग्न करण्यापर्यंत. सर्व काही फार लवकर घडले. अरबाज आणि मी आता अधिकृतपणे एकत्र आहोत. अलहमदुलिल्लाह.' शूरा खानने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर आता अरबाजच्या चाहत्यांसह नेटकरी कमेंट्स करायला लागले आहेत. या व्हिडीओला दोघांच्याही चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे.

Arbaaz Khan Propossed To Sshura Khan
Mann Ki Baat: फिटनेस 2 मिनिटांची मॅगी किंवा काफी..., अक्षय कुमारने 'मन की बात'मध्ये सांगितला फिटनेस मंत्रा

शूरा खानने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अरबाज खानने प्रतिक्रिया दिली. अरबाजने कमेंटमध्ये, 'On my knees feeling so so HIGH.', असे लिहिले आहे. याशिवाय टीना दत्ता आणि रिद्धिमा पंडित यांनीही दोघांनाही नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. अरबाज खान आणि शूरा 'पटना शुक्ला' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. परंतु त्यांची प्रेमकथा कशी सुरू झाली याबद्दल फारशी माहिती नाही.

Arbaaz Khan Propossed To Sshura Khan
Kedar Shinde: तुझा मी ऋणी आहे पण फक्त एकच विनंती..., २०२३ च्या शेवटी केदार शिंदेंची भावनिक पोस्ट चर्चेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com