'Panchak'मध्ये भूमिका कशी मिळाली? माधुरी दीक्षितनं कोणती अट घातली होती?, स्वतः आदिनाथ कोठारेनं रहस्य उलगडलं

Adinath Kothare Panchak Movie: या चित्रपटच्या प्रमोशनसाठी साम टीव्हीच्या ऑफिसमध्ये पंचकची टीम आली होती. यावेळी आदिनाथ कोठारेने त्याला पंचक चित्रपटाची ऑफर कशी मिळाली याबद्दल सांगितले.
Adinath Kothare And Madhuri Dixit
Adinath Kothare And Madhuri Dixit Saam Tv
Published On

Panchak Movie:

मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) लवकरच 'पंचक' (Panchak Movie) चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि श्रीराम नेने यांनी निर्मिती केलेला 'पंचक' पुढच्या वर्षी म्हणजेच ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटच्या प्रमोशनसाठी साम टीव्हीच्या ऑफिसमध्ये पंचकची टीम आली होती. यावेळी आदिनाथ कोठारेने त्याला पंचक चित्रपटाची ऑफर कशी मिळाली याबद्दल सांगितले.

पंचकची ऑफर कशी मिळाली याबद्दल सांगताना आदिनाथ कोठारे म्हणाला की, 'मला ना एक वेगळा माज आहे. मी '८३' चित्रपटाचं लंडनमध्ये शूटिंग करत होतो. तिकडे मला माधुरी मॅमच्या टीममधून माजगावकरांचा फोन आला. आदिनाथ असा असा चित्रपट आहे असं त्यांनी मला सांगितले. डायरेक्टर जे.एन जठार आहेत. तुझ्या रोलसाठी त्यांच्या डोक्यात कोणी तरी वेगळं आहे. पण माधुरी दीक्षित आणि डॉक्टर नेने यांनी मला अट घातली की हा चित्रपट तेव्हाच करू जेव्हा आदिनाथ हा रोल करेल. तेव्हाच मी त्यांना हो म्हणालो. गोष्ट काय आहे हे मला ऐकायचे नाही. मी करतोय ही फिल्म असं मी त्यांना सांगितले.'

Adinath Kothare And Madhuri Dixit
Bigg Boss 17: मला तुझ्यासोबत परत घरी नाही जायचं, अंकिता लोखंडेने विकी जैनकडे पुन्हा केली घटस्फोटाची मागणी

आदिनाथ कोठारेने पुढे सांगितले की, 'तो एक वेगळाच माज आहे की बापरे जेव्हा माधुरी दीक्षितसारखी पर्सनॅलिटी एका माझ्यासारख्या नटावर विश्वास ठेवते आणि सपोर्ट करते. ते सुद्धा दुसऱ्यांदा. अशावेळ माझ्यावरील एक जबाबदारी वाढते आणि माझी कॉलर देखील टाइट होते.' आदिनाथला ही गोष्ट सांगताना प्रचंड अभिमान वाटतो. तो नेहमी कुठेही मुलाखत देताना ही गोष्ट आवर्जुन सांगतो असे देखील त्याने सांगितले.

Adinath Kothare And Madhuri Dixit
Arbaaz Khan: ब्रेकअपनंतर ५६ वर्षांचा अरबाज खान पुन्हा पडला प्रेमात; मलायका, जॉर्जियानंतर 'या' सुंदरीत अडकला जीव

आदिनाथने यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल सांगता खूपच इमोशनल झाला. त्याने सांगितले की, ते माझ्यासाठी काकांसारखे होते. मी १५-१६ वर्षांचा होतो तेव्हा मोबाईलवरून आम्ही एकमेकांना जोक्स वैगरे पाठवायचो. कोण तरी काका हवा असतो तो आपल्याला मस्ती करायला शिकवतो. लक्ष्मीकांत बेर्डे हे माझ्यासाठी ते काका होतो. आणखी काही वर्षे ते आमच्यासोबत असते तर असे मला वाटायचे. पण मी त्यांना खूप मिस करतो. ते गेल्यानंतर अनेक वर्षे मी माझ्या वडिलांचे सिनेमे पाहू शकलो नाही. कारण आपण त्या गोष्टी मान्य करत नाही की ती व्यक्ती नाहीये.

Adinath Kothare And Madhuri Dixit
Panchak Movie: आदिनाथ कोठारेने उघड केली 'पंचक'ची मिस्ट्री, चित्रपटाच्या नावाचा काय आहे अर्थ?

आदिनाथने पुढे लक्ष्याकाकाची आणखी एक आठवण सांगितली. 'मला एक किस्सा आठवतोय छकुलाच्या सेटवरील. १९९४ मध्ये आमच्या शूटचा लास्ट डे होता. मला अजूनही तो क्षण आठवतोय. आम्ही गाडीत बसलो होतो. तेव्हा आम्ही बसने प्रवास करायचो मुंबई ते कोल्हापूर. डॅड बाजूला होते आणि आई बाजूला होती मी मध्ये बसलो होतो. लक्ष्याकाका आले आणि ते खिडकीत उभं राहून म्हणत होते की महेश मला आदिनाथसोबत आणखी एक चित्रपट करायचा आहे. डॅड एस एस बोलले आणि मी हसत होतो. पण ती संधी कधीच परत आली नाही. याची मला खंत वाटते.'

Adinath Kothare And Madhuri Dixit
Dunki Movie: 'डंकी' पाहायला जाण्यापूर्वी ४ पॉइंट्समध्ये जाणून घ्या कसा आहे राजकुमार हिरानींचा चित्रपट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com