Panchak Movie: आदिनाथ कोठारेने उघड केली 'पंचक'ची मिस्ट्री, चित्रपटाच्या नावाचा काय आहे अर्थ?

What Is Meaning Of Panchak: सध्या या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच साम टिव्हीला या चित्रपटाच्या टीमने भेट दिली. यावेळी त्यांनी खूप गप्पा मारल्या आणि चित्रपटातील रंजक किस्से सामच्या प्रेक्षकांसोबत शेअर केले.
Adinath Kothare
Adinath KothareSaam Tv
Published On

Panchak Movie:

मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारेचा (Adinath Kothare) आगामी चित्रपट 'पंचक' (Panchak Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि श्रीराम नेने यांनी निर्मिती केलेला 'पंचक' पुढच्या वर्षी म्हणजेच ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या टीझर, ट्रेलरनंतर टायटल साँग नुकताच रिलीज झाले. या सर्वांना देखील प्रेक्षकांनी खूप चांगली पसंती दिली.

सध्या या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच साम टिव्हीला या चित्रपटाच्या टीमने भेट दिली. यावेळी त्यांनी खूप गप्पा मारल्या आणि चित्रपटातील रंजक किस्से सामच्या प्रेक्षकांसोबत शेअर केले. यावेळी सर्वांना पडलेल्या पंचकचा अर्थ काय होतो आणि या चित्रपटाला असे नाव का देण्यात आले आहे या सर्व प्रश्नांची उत्तर आदिनाथ कोठारेसह टीमने दिली आहेत.

आदिनाथ कोठारे सांगतो की, 'चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले दिलीप प्रभावळकर म्हणजे माझे बाबा वारतात. त्यांच्या शोकसभेसाठी गावातील सर्व मंडळी येतात. अचानक ज्योतीष येतो. तो पंचाग काढतो आणि त्याला कळते की पंचक लागला. पंचक लागल्यामुळे सर्वांना धक्का बसतो. पंचक म्हणजे एका वर्षात तुमच्या कुटुंबातील किंवा कुटुंबाच्या जवळच्या ५ व्यक्ती मरू शकतात. मग काय करायचं गुरुजी असं सर्वजण विचारू लागतात. कुटुंब असल्यामुळे सगळ्यांचे दृष्टीकोन वेगवेगळे असतात आणि माझा दृष्टीकोण वेगळा असतो आणि मी त्याठिकाणी ठामपणे उभा राहतो आणि विरोध करतो या एका गोष्टीला. त्याच्यामुळे ड्रामा घडतो. हे डिटेल्स तुम्हाला चित्रपटगृहात कळेल. पण यातून जे काही घडतं ते कॉमेडीची सर्कस आहे.'

Adinath Kothare
Dunki Movie: 'डंकी' पाहायला जाण्यापूर्वी ४ पॉइंट्समध्ये जाणून घ्या कसा आहे राजकुमार हिरानींचा चित्रपट

चित्रपटाच्या कथेविषयी अभिनेत्री दिप्ती देवी सांगते की, 'पंचकमध्ये जे मिस्ट्रीयस वाटते ते म्हणजे प्रत्येकाची भीती वेगळी आहे. त्याची भीती त्रयस्त म्हणून मी पाहताना मला त्यातला जो विनोद करतो तो म्हणजे पंचक. सगळे घाबरलेले आहेत. सगळ्याची भीती वेगळी आहे त्याचसोबत स्वभाव वेगळे आहेत. त्या भीतीमुळे जी काही कॉमेडी तयार झाली आहे ती दाखवण्याचा प्रयत्न पंचकमध्ये केला आहे.'

Adinath Kothare
Arbaaz Khan: ब्रेकअपनंतर ५६ वर्षांचा अरबाज खान पुन्हा पडला प्रेमात; मलायका, जॉर्जियानंतर 'या' सुंदरीत अडकला जीव

दरम्यान, पंचक चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर आणि गणेश मयेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत.

Adinath Kothare
Bigg Boss 17: मला तुझ्यासोबत परत घरी नाही जायचं, अंकिता लोखंडेने विकी जैनकडे पुन्हा केली घटस्फोटाची मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com