Ghungru Ek Sangharsh Collection: गौतमीचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला; ७ दिवसातच गुंडाळला गाशा

Gautami Patil 1st Movie Collection: कायमच डान्समुळे प्रसिद्ध असलेल्या गौतमीचा १५ डिसेंबरला 'घुंगरु' चित्रपट रिलीज झाला. फ्रीमध्ये गौतमीचा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच तुडूंब गर्दी करतात. पण तिच्या पहिल्याच चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.
Ghungru Ek Sangharsh Film Flop
Ghungru Ek Sangharsh Film Flopsaam tv
Published On

Ghungru Ek Sangharsh Film Flop

प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) कायमच सर्वत्र चर्चेचा विषय असते. आपल्या लावणीच्या तालावर गौतमी नेहमीच अख्ख्या महाराष्ट्राला ठेका धारायला लावते. कायमच डान्समुळे प्रसिद्ध होणाऱ्या गौतमीचा १५ डिसेंबरला चित्रपट रिलीज झाला. तिच्या लावणीच्या कार्यक्रमाला जितकी गर्दी होते, त्याहून जास्त गर्दी तिच्या चित्रपटाला होणार अशी चर्चा झाली होती. पण असं काहीच घडलं नसल्याचं दिसत आहे. तिच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळतच आहे. (Marathi Film)

Ghungru Ek Sangharsh Film Flop
Japan Earthquake: जपानमधील भूकंपाने Jr.NTR हादरला, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला...

१५ डिसेंबरला गौतमीचा 'घुंगरु' चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत गौतमीसह बाबा गायकवाड, सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. (Marathi Actress)

बाबा गायकवाडी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यांनी चित्रपटाची कथा लेखन, अभिनय आणि निर्मितीची धुराही त्यांनी सांभाळली. चित्रपटाला प्रेक्षकांकडून म्हणून तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. आपल्या डान्समधील अदांमुळे गौतमी चांगलीच चर्चेत असते. गौतमी पाटीलचा अवघ्या महाराष्ट्रात चाहतावर्ग आहे. तिला पाहण्यासाठी तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण एकच गर्दी करतात. (Gautami Patil)

Ghungru Ek Sangharsh Film Flop
Rakesh Bedi: 'गदर २' फेम अभिनेत्याची मोठी फसवणूक, आर्मी ऑफिसर असल्याचे सांगून ७५ हजारांना लावला चुना

गौतमीच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांनी पाठ फिरवलीय. अवघ्या सात दिवसातच गौतमीच्या 'घुंगरु' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरुन आपला गाशा गुंडाळाला. चित्रपटाच्या अनेक शोला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली नाही. चित्रपटाचे फारसे प्रमोशनही होताना पाहायला मिळाले नाही.

चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत नसल्यामुळे काही दिवसातच चित्रपटाचे बॅनर देखील उतरवण्यात आले. कायमच गौतमीच्या लावणीच्या कार्यक्रमामध्ये तोबा गर्दी करणारे चाहते तिच्या चित्रपटालाही उत्तम प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा होती.

पण वास्तवात चित्रपट पाहायला येणाऱ्यांची संख्या फार कमी होती. त्यामुळे अवघ्या ७ दिवसातच चित्रपट काढण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. (Entertainment News)

Ghungru Ek Sangharsh Film Flop
Bigg Boss 17: सुशांतच्या शेवटच्या आठवणीत पुन्हा इमोशनल झाली अंकिता लोखंडे, म्हणाली - 'त्याला तसं पाहून माझे हात पाय थंड पडले'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com