Sangharsh Yodha Movie: 'संघर्षयोद्धा' चित्रपटाचे शूटिंग थांबवलं, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवल्यामुळे घेतला निर्णय

Manoj Jarange Patil: सरकारने मराठा आंदोलकांच्या ज्या मागण्या मान्य केल्या त्याचे कायद्यात रुपांतर करावे आणि विशेष अधिवेशन घ्यावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.
Sangharsh Yodha Movie
Sangharsh Yodha MovieSaam Tv
Published On

Movie on Manoj Jarange Patil :

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं हा मुद्दा उचलून धरून गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष करणारे मराठा समजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित 'संघर्षयोद्धा' हा चित्रपट (Sangharsh Yodha Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. जानेवारीपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली.

अशामध्ये, सरकारने मराठा आंदोलकांच्या ज्या मागण्या मान्य केल्या त्याचे कायद्यात रुपांतर करावे आणि विशेष अधिवेशन घ्यावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. अशामध्ये त्यांची प्रकृती खालवण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता 'संघर्षयोद्धा' चित्रपटाच्या टीमकडून चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. त्यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

संघर्षयोद्धा चित्रपटाच्या टीमकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामाध्यमातून त्यांनी चित्रपटाचे शूटिंग आज बंद ठेऊन मनोज जरांगे पाटील यांना जाहिर पाठिंबा दिल्याचे सांगितले आहे. या परिपत्रकात त्यांनी असे देखील लिहिले आहे की, 'मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले असून दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. तरी सरकारने लवकरात लवकर सगेसोयरे याच्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा म्हणून तसेच जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून त्यांच्या आयु्ष्यावर तयार होत असलेला संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचे शूटिंग आज बंद राहील.'

Sangharsh Yodha Movie
Sangharsh Yodha MovieSaam Tv
Sangharsh Yodha Movie
Madhuri Dixit: 'भूल भुलैया 3'मध्ये आता माधुरी दीक्षितची एन्ट्री, 'मंजुलिका'ची भूमिका साकारणार का?

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे यांनी अन्न तसेच पाण्याचा त्याग केला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असून त्यांना बोलताही येत नाहीये. त्याचसोबत त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत राज्य सरकार सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा आणि विशेष अधिवेशन बोलावून मराठा समजाला न्याय मिळवून देत नाही. तोपर्यंत माझे उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

Sangharsh Yodha Movie
Fighter Movie: हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा 'फायटर' सुसाट, 2024 मधला पहिला सुपरहिट चित्रपट

दरम्यान, अभिनेता रोहन पाटील 'संघर्षयोद्धा' या चित्रपटामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारत आहे. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे. सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद लेखन केले आहे. तर शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. 'संघर्षयोद्धा' या चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. 'संघर्षयोद्धा' हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

Sangharsh Yodha Movie
आधी हात पडकला... नंतर केलं किस, चाहत्याकडे पाहून Shah Rukh Khan ने दिली अशी रिअ‍ॅक्शन; VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com