बॉलिवूड (Bollywood) अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या 'फायटर' चित्रपटामुळे (Fighter Movie) चर्चेत आहे. २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची आजही प्रेक्षकामध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई केली. पण त्यानंतर या चित्रपटाच्या कमाईमध्ये चढउतार पाहायला मिळाली. २५० कोटींच्या बजेचमध्ये तयार झालेला फायटर बॉक्स ऑफिसवर सुसाट चालला आहे.
अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर फायटरला त्याच्या एड्रेनालाईन एरियल ॲक्शन सीक्वेन्ससाठी चांगला गाजला. हा चित्रपट बॉक्स ऑफिससह जगभरामध्ये चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाच्या जगभरातील कमाईचा आकडा चांगलाच वाढला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ३५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. अशापद्धतीने हा चित्रपट इतक्या कोटींची कमाई करणारा २०२४ मधील पहिला सुपरहिट चित्रपट ठरला आहे.
वीकेंडपासून फायटरने फक्त देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रेक्षकांना आकर्षित केले असून ज्यामुळे जगभरात हा चित्रपट सुपरहिट ठरला. IAF योद्धांचे धैर्य, बलिदान आणि दृढनिश्चय यांना समर्पित फायटर या वीरांच्या उल्लेखनीय कथा आणि त्यांनी संरक्षण केलेल्या आकाशाशी त्यांचे अतूट नाते उलगडते. हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर हे कलाकार या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहे.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई सुद्धा केली. Marflix Pictures च्या सहकार्याने Viacom18 Studios द्वारे निर्मित Fighter हा भारतातील पहिला एरियल ॲक्शन ड्रामा आहे. जो 2024 मधील पहिला सुपरहिट चित्रपट ठरला आहे. या चित्रपटामध्ये हृतिक रोशनने स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानियाची भूमिका साकारली आहे. दीपिका पदुकोण स्क्वाड्रन लीडर मीनल राठोडच्या भूमिकेत तर अनिल कपूर ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंगच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटातील हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.