Showtime Trailer: इमरान हाश्मीच्या 'शोटाइम'चा धमाकेदार ट्रेलर आऊट, मौनी रॉयने जिंकलं प्रेक्षकांचे मन

Showtime Web Series Trailer: या वेबसीरिजमध्ये इमरान आणि मौनी व्यतिरिक्त नसीरुद्दीन शाह देखील दिसणार आहेत. या वेबसीरिजच्या माध्यमातून इमरान खान ओटीटीवर धमका करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Showtime Trailer
Showtime TrailerSaam Tv
Published On

Emraan Hashmi And Mouny Roy:

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आणि अभिनेत्री मौनी रॉय (Mouny Roy) त्यांच्य अपकमिंग वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. नुकताच त्यांची वेब सीरिज 'शोटाइम'चा धमाकेदार ट्रेलर (Showtime Trailer) रिलीज झाला. हा ट्रेलर पाहून इमरान आणि मौनीच्या चाहत्यांच्या मनामध्ये वेबसीरिजबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ते या वेबसीरिजच्या रिलीजची वाट पाहत आहेत. या वेबसीरिजमध्ये इमरान आणि मौनी व्यतिरिक्त नसीरुद्दीन शाह देखील दिसणार आहेत. या वेबसीरिजच्या माध्यमातून इमरान खान ओटीटीवर धमका करण्यासाठी सज्ज झाला आहे.

सलमान खानच्या 'टायगर' चित्रपटामध्ये विलनची जबरदस्त भूमिका साकारल्यानंतर इमरान खान त्याच्या आगामी वेबसीरिज शोटाइमच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या वेबसीरीजच्या ट्रेलरवरून फिल्मी दुनियेतील पडद्यामागे दडलेली काळी गुपिते उलगडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारने या वेबसीरिजसाठी चित्रपट निर्माता करण जोहरशी हातमिळवणी केली आहे.

इमरान हाश्मीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शोटाइमचा अधिकृत ट्रेलर शेअर केला आहे. त्याने या वेबसीरिजचा ट्रेलर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सिनेमा धंदा नाही, तर धर्म आहे.' सध्या सोशल मीडियावर इमरानच्या या वेबसीरिजच्या ट्रेलरचीच चर्चा सुरू आहे. या वेबसीरिजमध्ये इमरान हाश्मी, मौनी रॉय,नसीरुद्दीन शाह, विजय राज, महिमा मकवाना, राजीव खंडेलवाल आणि श्रिया सरन हे कलाकार दिसणार आहेत.

Showtime Trailer
Bhool Bhulaiyaa 3: खरंच अक्षय कुमार 'भूल भुलैया 3'मध्ये दिसणार आहे का?, दिग्दर्शकाने आता स्पष्टपणेच सांगितले...

'शोटाइम' या वेबसीरिजमध्ये इमरान हाश्मी चित्रपट निर्माता म्हणून दिसत आहे. ट्रेलरची सुरुवात इमरान हाश्मीच्या संवादाने होते आणि तो म्हणतो - 'मला माहित होते की हा स्टुडिओ मला खैरात म्हणून मिळाला आहे. तरीही रात्रंदिवस मेहनत करून मी तो इथपर्यंत पोहोचवला आणि त्या बदल्यात मला काय मिळाले की मी या खुर्चीवर आहे. मी लायक नाही.' या ट्रेलरमध्ये मौनी रॉयने प्रेक्षकांच्या मन जिंकले आहे. दरम्यान, या वेबसीरिजनंतर इमरान हाश्मी आगामी तेलगू आणि हिंदी भाषेतील ॲक्शन चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो 'ओजी' आणि स्पाय थ्रिलर 'गुडाचारी 2' आणि 'वतन मेरे वतन' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Showtime Trailer
Rahul Vaidya आणि Disha Parmar ने पहिल्यांदाच दाखवला मुलीचा चेहरा, VIDEO पाहून सांगा कोणासारखी दिसते?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com