Shah Rukh Khan Video
Shah Rukh Khan VideoSaam Tv

आधी हात पडकला... नंतर केलं किस, चाहत्याकडे पाहून Shah Rukh Khan ने दिली अशी रिअ‍ॅक्शन; VIDEO व्हायरल

Fan Kiss On Shah Rukh Khan Hand: शाहरुख खानचे आपल्या चाहत्यांवर किती प्रेम आहे याचा प्रत्यय नेहमी येत असतो. तो कधीच आपल्या चाहत्यांना नाराज करत नाही. आपल्या चाहत्यांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी तो सोडत नाही.
Published on

Shah Rukh Khan Video:

बॉलीवूडचा (Bollywood) 'बादशाह' म्हणजेच अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. शाहरुख खान अभिनयासोबतच त्याच्या वागण्या-बोलण्यामुळेही चाहत्यांना प्रचंड आवडतो. शाहरुख खानचे आपल्या चाहत्यांवर किती प्रेम आहे याचा प्रत्यय नेहमी येत असतो. तो कधीच आपल्या चाहत्यांना नाराज करत नाही. आपल्या चाहत्यांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी तो सोडत नाही.

असाच काहीसा प्रकार नुकताच घडला आहे. शाहरुख खानला पाहून एका चाहत्याने आधी त्याचा हात पकडला आणि नंतर हातावर किस केले. चाहत्यांच्या या प्रेमाचे अभिनेत्याने हसत स्वागत केले. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्याचे हे वागणं चाहत्यांना प्रचंड आवडले असून ते त्याचे कौतुक करत आहेत.

मंगळवारी संध्याकाळी शाहरुख खान मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी देखील त्याच्यासोबत होती. यावेळी शाहरुख खान त्याच्या आलिशान कारमधून उतरून एअरपोर्टच्या दिशेने जाताना दिसला. शाहरुख खानला एअरपोर्टवर पाहून चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. शाहरुखने देखील आपल्या चाहत्यांना नाराज केले नाही. त्याने एअरपोर्टवर पासपोर्ट आणि तिकीट तपासणी करत असताना आपल्या चाहत्यांना वेळ दिला आणि त्यांना भेटला.

यावेळी गर्दीतून एका चाहत्याने हात पुढे करत शाहरुख खानचा हात पकडला. त्यानंतर या चाहत्याने शाहरुखच्या हातावर किस केले. त्यानंतर शाहरुख खानने देखील आपल्या चाहत्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि क्युट स्माइल दिली. शाहरुख खानचे हे कृत्य सर्वांना प्रचंड आवडले आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेत आला आहे. शाहरुख खान त्याच्या या कृत्यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनामध्ये राजा झाला आहे.

Shah Rukh Khan Video
Shah Rukh Khan ने पहिल्या व्हॅलेंटाइन डेला Gauri Khan ला काय दिलं होतं गिफ्ट?, स्वत:च केला खुलासा

शाहरुख खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, 2023 मध्ये अभिनेत्याने बॉलिवूडला एका पाठोपाठ तीन सुपरहिट चित्रपट दिले. 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खानने चाहत्यांचे मन जिंकले. ऐवढचं नाही तर या चित्रपटांनी बॉक्स ऑफिससह जगभरामध्ये बक्कळ कमाई केली. आता चाहते शाहरुख खानच्या नव्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Shah Rukh Khan Video
Showtime Trailer: इमरान हाश्मीच्या 'शोटाइम'चा धमाकेदार ट्रेलर आऊट, मौनी रॉयने जिंकलं प्रेक्षकांचे मन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com