बॉलिवूड (Bollywood) अभिनेता कार्तिक आर्यनाच्या (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2'(Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. आता या फ्रेंचाइजी चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच 'भूल भुलैया 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'भूल भुलैया 3' चित्रपटाशी (Bhool Bhulaiyaa 3 Movie) संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
दोन दिवसांपूर्वी कार्तिक आर्यनने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत या चित्रपटामध्ये विद्या बालनची एन्ट्री झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता आणखी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची या चित्रपटामध्ये एन्ट्री झाली आहे. कार्तिक आर्यन आणि विद्या बालनसोबत आता माधुरी दीक्षित देखील या चित्रपटामध्ये दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी दीक्षितची 'भूल भुलैया 3' चित्रपटाने एन्ट्री झाला आहे. या चित्रपटामध्ये माधुरी दीक्षित भूताच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. 'मिड डे'च्या ताज्या रिपोर्टनुसार, 'भूल भुलैया 3' चित्रपटात माधुरी दीक्षितला कास्ट करण्याची इच्छा निर्माते व्यक्त करत आहेत. 'भूल भुलैया 2' या चित्रपटातील महिला अभिनेत्रीची म्हणजे तब्बूची व्यक्तिरेखा खूपच दमदार होती.
त्यामुळे 'भूल भुलैया 3' चित्रपटातील महिला अभिनेत्रीची भूमिका प्रभावी करायची निर्मात्यांची इच्छा आहे. निर्मात्यांनी आधीच विद्या बालनला चित्रपटात कास्ट केले होते आणि त्यांना चित्रपटात दुसरी महिला सुपरस्टार हवी होती आणि अशा भूमिकेसाठी माधुरी दीक्षितपेक्षा कोण अधिक चांगले असू शकते? त्यामुळे त्यांनी माधुरी दीक्षितला चित्रपटामध्ये कास्ट केले आहे.
माधुरी दीक्षितबद्दल अशा अंदाज लावला जात आहे की, माधुरी या चित्रपटामध्ये भूताची भूमिका साकारणार आहे. म्हणजे या चित्रपटामध्ये दोन मंजुलिका पाहायला मिळणार आहे. याचा अर्थ यावेळी कार्तिक आर्यन एक नाही तर दोन भूतांशी लढताना दिसणार आहे.
महत्वाचे म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार देखील या चित्रपटाचा पार्ट असणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सोशल मीडियावर चाहते अक्षय कुमारला 'भूल भुलैया 3' या चित्रपटात एन्ट्री करण्याची मागणी करत आहेत. अशामध्ये 'भूल भुलैया 3' या चित्रपटातील अक्षय कुमारच्या एन्ट्रीबाबत दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी मौन सोडले. अक्षय कुमार 'भूल भुलैया 3' चित्रपटाचा भाग नाही. अनीस बज्मी यांच्या या वक्तव्यानंतर सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.