Baloch Official Trailer: रणरणत्या वाळवंटात दिसणार तप्त मराठी बाणा... अंगावर शहारा येणारा ‘बलोच’चा ट्रेलर प्रदर्शित

बलुचिस्तानातील गुलामगिरीवर मात करून जिद्दीनं विजयाचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या मराठ्यांच्या रोमांचकारी लढाईवर आधारित ‘बलोच’ हा चित्रपट आहे.
Baloch Official Trailer
Baloch Official TrailerYou Tube

Baloch Marathi Film Official Trailer Out: बलुचिस्तानात झालेल्या लढाईत मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला, गुलामगिरी पत्करावी लागली. सळसळतं रक्त मराठ्यांना शांत बसू देत नव्हतं, आपली हार सहजासहजी स्वीकारतील ते मराठे कसले? बलुचिस्तानातील गुलामगिरीवर मात करून जिद्दीने विजयाचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या मराठ्यांच्या रोमांचकारी लढाईवर आधारित 'बलोच' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच संपन्न झाला. या वेळी भव्य रांगोळी, तुतारी, ढोल ताशाच्या गजरात, मराठमोळ्या, राजेशाही थाटात उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.

Baloch Official Trailer
Rakhi Sawant Want Z Security: काय सांगता...! राखीला हवी आहे Z सुरक्षा; लवकरच पंतप्रधान मोदींची घेणार भेट

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरनंतर या चित्रपटातील 'खुळ्या जिवाला आस खुळी' हे पहिलं प्रेमगीत प्रदर्शित झाले होते. यावरून या चित्रपटात एका मराठमोळ्या मावळ्याचे निरागस प्रेम तर दुसरीकडे बलुचिस्तानातील रोमांचकारी युद्ध अनुभवायला मिळणार आहे. ‘बलोच’चा टिझर अंगावर शहारे आणणारा आहे.

चित्रपटातील दमदार संवाद मनाला भिडणारे आहेत. एका मराठी लढवय्याची आणि त्याच्या सहकाऱ्यांची ही कहाणी आहे. गुलामगिरी पत्करूनही त्यांनी हार मानली नाही. त्यांचा हा विजय म्हणजे ‘बलोच’. चित्रपटाच्या ट्रेलरवरून चित्रपटाची भव्यता कळतेय. (Marathi Film)

बलुचिस्तानमध्ये झालेल्या लढाईत मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला, गुलामगिरी पत्करावी लागली. सळसळतं रक्त मराठ्यांना शांत बसू देत नव्हतं, आपली हार सहजासहजी स्वीकारतील ते मराठे कसले? बलुचिस्तानातील गुलामगिरीवर मात करून जिद्दीनं विजयाचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या मराठ्यांच्या रोमांचकारी लढाईवर आधारित ‘बलोच’ हा चित्रपट आहे.

Baloch Official Trailer
Irrfan Khan Movie: माहित नसलेल्या गोष्टी उलगडणार... निधनानंतर ३ वर्षांनी येणार इरफानचा शेवटचा चित्रपट

अमेय विनोद खोपकर, विश्वगुंज पिक्चर्स, कीर्ती वराडकर फिल्म्स आणि अमोल कागणे स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शक, कथा, पटकथाकार प्रकाश जनार्दन पवार आहेत. तर महेश करवंदे (निकम), जीवन जाधव, गणेश शिंदे, दत्ता काळे, जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड निर्माते असून पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार हे सहनिर्माते आहेत. (Marathi Actors)

प्रवीण तरडे, अशोक समर्थ, स्मिता गोंदकर, रमेश परदेशी, अमोल कागणे, सुरभी भोसले यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या असून हा चित्रपट येत्या ५ मे रोजी ‘बलोच’ प्रदर्शित होणार आहे. ‘बलोच’च्या वितरणाची धुरा फिल्मास्त्र स्टुडिओजच्या अमेय खोपकर, अमोल कागणे, प्रणित वायकर यांनी सांभाळली आहे.

Baloch Official Trailer
Nawazuddin Siddiqui Sprite Ad: नवाजुद्दिन अडचणीत? बंगाली भाषिकांनी केली गुन्हा दाखल करण्याची मागणी, काय आहे प्रकरण?

चित्रपटाविषयी दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, “पानिपतच्या लढाईत मराठ्यांच्या पदरी घोर निराशा पडली. कधी हार न स्वीकारणारे मराठे गुलामगिरीला मुकले. परक्यांचा अन्याय, अत्याचार सहन करत प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता समर्पण देणाऱ्या हरहुन्नरी वीरांची शौर्यगाथा 'बलोच' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही पराभवाची कहाणी नसून मराठ्यांच्या विजयगाथेची कहाणीआहे. अतिशय शानदार पद्धतीने या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला, खूपच आनंद आहे या गोष्टीचा. प्रत्येक कलाकार उत्कृष्ट आहे आणि त्यांचा दमदार अभिनय पडद्यावर दिसेलच. या चित्रपटातील लढवय्या मराठ्यासाठी प्रवीण तरडे यांच्या शिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही.”

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com