Nawazuddin Siddiqui Sprite ad under fire for ‘hurting’ Bengali Sentiments: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अडचणी काही कमी होण्याचे नाव घेत नाही. आधी पत्नी आणि भावासोबतचा वाद संपतो तेच आता त्याच्या नव्या वादाला तोंड फुटले आहे. बंगाली समुदायाच्या भावना दुखावल्याबद्दल नवाजुद्दीन सिद्दीकी आणि कोका-कोलाच्या भारतीय विभागाचे सीईओ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनेता एका स्प्राईट जाहिरातीत दिसला, ती जाहिरात हिंदी भाषेत होती. जाहिरातीच्या हिंदी आवृत्तीवर कोणताही आक्षेप घेण्यात आलेला नसला तरी कोलकाता येथील एका वकिलाने बंगाली आवृत्तीतील एका ओळीवर आक्षेप घेतला आहे.
LiveMint या इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या संकेतस्थळानुसार, कोलकाता उच्च न्यायालयाचे वकील दिब्यान बॅनर्जी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. दिब्यान यांनी कोर्टात सांगितले की, “कोका-कोलाने स्प्राइटच्या उत्पादनासाठी दिलेली जाहिरात हिंदीत होती. आणि आम्हाला यात कोणतीही अडचण नाही. आम्हाला फक्त अनेक टीव्ही चॅनेल आणि वेबसाइट्सवर चालणाऱ्या जाहिरातींच्या बंगाली डबिंगची समस्या आहे. (Entertainment News)
नवाजुद्दिन सिद्दीकी एका बंगाली विनोदावर हसतो. याचा अर्थ असा की, ‘बंगाली लोकांना सहज काही मिळाले नाही तर ते उपाशी झोपतात.’ असं त्या जाहिरातीत म्हटलं आहे. त्यामुळे बंगाली समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे आम्हाला वाटते. भविष्यात अशा स्वस्त कृत्यांना आणि नौटंकींना प्रोत्साहन मिळू नये, अशी आमची इच्छा आहे.” अशी यावेळी वकील दिब्यान बॅनर्जी यांनी भावना व्यक्त केली. (Bollywood Actor)
नुकतंच कोको-कोला कंपनीने आता माफीनामा जारी केला आहे. वाद निर्माण झाल्यानंतर या जाहिरातीची बंगाली आवृत्ती काढून टाकण्यात आली आहे. स्प्राइट इंडियाने एक नोट जारी केली आहे ज्यात म्हटले आहे की, “कोल्ड ड्रिंकच्या अलीकडील जाहिरात मोहिमेबद्दल खेद वाटतो आणि कंपनी बंगाली भाषेचा आदर करते.” (Bollywood Film)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.