Mukta-Sagar: विवाह सोहळाआधी मुक्ता-सागरला सोशल मीडिया स्टारनं दिली सुग्रास जेवणाची मेजवानी

Nalini Mumbaikar : सोशल मीडिया स्टार नलिनी मुंबईकरने मुक्ता, सागर, इंद्रा आणि चिमुकल्या सईला सुग्रास जेवणाची मेजवानी दिली. प्रेमाची गोष्ट मालिकेतल्या कलाकारांच्या स्वागतासाठी संपूर्ण कोळीवाडा सजला होता.
Mukta Sagar wedding
Mukta Sagar wedding Saam Tv
Published On

Mukta Sagar Dinner Party Nalini Mumbaikar:

गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या लग्नाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्या मुक्ता-सागरचा विवाहसोहळा येत्या आठवड्यात पार पडणार आहे. मेहंदी, संगीत आणि हळदीचा कार्यक्रम थाटात पार पडला. आता उत्सुकता आहे तर लग्नाची. गोखले आणि कोळी कुटुंबाने लग्नाची जय्यत तयारी केली असून विवाहसोहळ्यात स्टार प्रवाह परिवारातले खास पाहुणेही येणार आहेत. (Latest News)

मालिकेत लग्नाची धामधूम पाहायला मिळेलच. पण पडद्यामागेही मुक्ता-सागरच्या लग्नासाठी प्रेक्षकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. अलिबागमधल्या कोळीवाड्यात नुकताच मुक्ता-सागरचं केळवण पारंपरिक पद्धतीने पार पडलं. सोशल मीडिया स्टार नलिनी मुंबईकरने मुक्ता, सागर, इंद्रा आणि चिमुकल्या सईला सुग्रास जेवणाची मेजवानी दिली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 Mukta Sagar
Mukta SagarSaam Tv

प्रेमाची गोष्ट मालिकेतल्या कलाकारांच्या स्वागतासाठी संपूर्ण कोळीवाडा सजला होता. कोळी गाण्यांच्या ठेक्यावर कलाकारांचं स्वागत झालं. अलिबागकरांचं प्रेम पाहून मुक्ता-सागर भारावून गेले. केळवणाच्या या खास दिवशी मुक्ताने खास उखाणाही घेतला. ‘नलिनी काकुंनी आमंत्रण देऊन प्रेमाची गोष्ट केली मोठी. स्टार प्रवाहच्या साक्षीने भरली मुक्ताची खणा नारळाने ओटी. अलिबागकरांनी घातलाय सागर-मुक्ताच्या केळवणाचा घाट. पहाण्यासाठी सई सुद्धा पोहोचली धरुन इंद्रा आजीचा हात.’ मुक्ताच्या या उखाण्याने केळवणाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.

Mukta Sagar wedding
Arbaaz Khan Wedding:५६ वर्षाचा अरबाज खान दुसऱ्यांदा बनला नवरदेव ; कोण आहे सलमान खानची नवी वहिनी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com