Arbaaz Khan Wedding:५६ वर्षाचा अरबाज खान दुसऱ्यांदा बनला नवरदेव ; कोण आहे सलमान खानची नवी वहिनी

Arbaaz Khan : अरबाज खान वयाच्या ५६ व्या वर्षी दुसऱ्यांदा नवरदेव झालाय. अरबाज खान त्याची बहीण अर्पिता खानच्या घरी एका छोट्या कार्यक्रमात दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. अरबाज खान आणि मलायका अरोराचा मुलगा अरहानही त्याच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नात सहभागी होणार आहे.
Ajrabj Khan
Ajrabj KhanANI
Published On

Ajrabj Khan Wedding:

सलमान खानचा धाकटा भाऊ अरबाज खान हा त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. अरबाज खान वयाच्या ५६ व्या वर्षी दुसऱ्यांदा नवरदेव झालाय. अरबाज खानच्या घरी लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. त्याच्या निकाहमध्ये सहभागी होण्यासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे स्टार्सही पोहोचले आहेत. (Latest News)

अरबाज खान त्याची बहीण अर्पिता खानच्या घरी एका छोट्या कार्यक्रमात दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. अरबाजच्या दुसऱ्या लग्नात हजेरी लावण्यासाठी कुटुंबीयांसह अनेक बॉलिवूड स्टार्स अर्पिता खानच्या घरी उपस्थित झाले आहेत. अरबाज खान आणि मलायका अरोराचा मुलगा अरहानही त्याच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नात सहभागी होणार आहे. अरहान व्यतिरिक्त अरबाज खानचा धाकटा भाऊ सोहेलचा मुलगा, त्याचे वडील सलीम खान,आई सलमा, भाऊ सलमान, बहीण अलविरा आणि मेहुणा अतुल अग्निहोत्री अर्पिता खानच्या घरी आले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोण आहे सलमानची नवी वहिनी

गेल्या काही वर्षांपासून अरबाज हा मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत होता. मात्र काही दिवसांपूर्वीच जॉर्जियाने एका मुलाखतीत अरबाजशी ब्रेकअप झाल्याचा खुलासा केला. त्यानंतर आता अरबाज लग्न करत आहे. अरबाज खान मेकअप आर्टिस्ट शौरा खानशी निकाह करत आहे. माध्यमांनुसार, हे दोघे खूप दिवसांपासून डेट करत होते. शौरा खान आणि अरबाजची पहिली भेट ‘पटना शुक्ला’या चित्रपटाच्या सेटवर झाली.

अरबाज खानने १९९८ मध्ये अभिनेत्री मलायका अरोरासोबत लग्न केले होते. जवळजवळ १९ वर्षानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला. मलायकाला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज मॉडेल जॉर्जियाला डेट करू लागला होता. तर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. जॉर्जियाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अरबाजच्या ब्रेकअपचा खुलासा केला होता

Ajrabj Khan
Arbaaz Khan Wedding Rumors: उद्या कुठं यायचं?, पापाराझींनी लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नावर अरबाज खाननं दिलं असं रिअ‍ॅक्शन; VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com