दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी ‘गुरूपौर्णिमा’ सेलिब्रेट केली जाते. या दिवशी हिंदू धर्मामध्ये, गुरूपौर्णिमेला विशेष महत्व आहे. विशेष म्हणजे, या दिवशी गुरूला देवासमान मानले जाते आणि गुरूला देवाचा दर्जा देऊन त्यांची मानोभावे पूजा केली जाते. शिवाय, त्यांचा आदरपूर्वक सन्मानही केला जातो. अगदी बालपणापासून ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरू येत असतात. प्रत्येक क्षेत्रातला व्यक्ती आपआपल्या पद्धतीने गुरुचे आभार मानत असतो. अशात मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी देखील सोशल मीडियावर गुरुपौर्णिमेनिमित्त काही पोस्ट शेअर केल्यात.
अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने ही आपल्या गुरूबद्दल खास पोस्ट शेअर केली आहे. उर्मिला कोठारे एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती एक प्रसिद्ध डान्सरही आहे. त्यांच्या सोबतचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने गुरुंना वंदन करत त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये उर्मिलाने आपल्या गुरुंबद्दल लिहिले की, " "गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! माझ्या गुरू स्वर्गीय श्रीमती आशा जोगळेकर (मावशी) यांच्या सोबतची काही मोजकी क्षणचित्रे. गुरू हा फक्त शिकवत नाही तर आपल्याला घडवतो."
पोस्टमध्ये अभिनेत्रीने आपल्या गुरूविषयी लिहिले की, "माझ्या आई वडिलांनंतर जर मला कोणी घडवलं असेल तर ते मावशींनी...मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजते, की मला मावशीच्या रूपात, एक निस्वार्थी, निर्मळ त्याचबरोबर एक शिस्तबद्ध गुरू लाभला. यासाठी मी कायम देवाचे खूप खूप आभार मानते. तुम्ही जिथे कुठे असाल, मावशी तिथून तुम्ही मला सतत आशीर्वाद देत आहात याची मला खात्री आहे. तुमची उणिव सतत भासत राहणार आहे आयुष्यभर." अभिनेत्रीचीही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
उर्मिला कोठारेबद्दल बोलायचे तर, उर्मिला कोठारे मराठी फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक मराठी चित्रपट आणि मराठी सीरियल्समध्ये काम केलं आहे. 'दुनियादारी', 'टाईमपास', 'ती सध्या काय करते' आणि 'गुरू' या चित्रपटातील तिने साकारलेल्या भूमिकेसाठी तिला ओळखलं जातं. उर्मिलाने स्टार प्रवाह वाहिनीवरील 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेमध्ये काम केलं होतं. उर्मिलाच्या या भूमिकेचं प्रेक्षकांकडून भरघोस कौतुकही करण्यात आलं होतं. उर्मिला एक उत्तम नृत्यांगना देखील आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.