Kajal Agrawal Life Untold Story: टॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली काजल अग्रवाल. टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत नेहमीच काजलच्या अभिनयाची सिनेसृष्टीत चर्चा कायम आहे. तिने एकापेक्षा एक अनेक हिट चित्रपट टॉलिवूडला दिले आहेत. कोणतीही विशेष ओळख नसताना काजलने भारतीय सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली. काजल ‘सिंघम’, ‘स्पेशल २६’, ‘दो लफ्जों की कहानी’ या सारख्या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिसली होती. आपल्या दमदार अभिनयाने आणि हॉटनेसने सर्वांना वेड लावणाऱ्या काजलचा आज ३८ वा वाढदिवस आहे. चला तर जाणून घेऊया तिचा फिल्मी प्रवास...
काजल अग्रवालचा जन्म १९ जून १९८५ रोजी मुंबईत झाला. अभिनेत्रीने मास मीडिया विषयामध्ये पदवी मिळवली आहे. काजलला बालपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. यामुळे तिने ‘बॅकग्राउंड डान्सर’ म्हणून करिअरला सुरुवात केली होती.‘क्यों हो गया ना’ या चित्रपटात काजलने बॅकग्राउंड डान्सर म्हणून दिसली. त्या चित्रपटात मुख्य भूमिकेत विवेक ऑबेरॉय आणि ऐश्वर्या राय असून काजलने ऐश्वर्याच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
त्या चित्रपटानंतर काजल भारतीराजा दिग्दर्शित ‘बोमलट्टम’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अर्जुन सर्जा आणि नाना पाटेकर यांनीही प्रमुख भूमिका साकारली होती. काजलने दिलेल्या मुलाखतीत, हिंदी चित्रपटांसोबतच ती तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. कारण तिने तिच्या फिल्मी कारकिर्दीची सुरूवात तिथून केली होती.
काजलच्या मते, बॉलिवूडमध्ये फारशी प्रसिद्धी मिळत नाही म्हणून तिने तामिळ फिल्म इंडस्ट्रीत चित्रपटात काम करण्याचे ठरवले. काजलने २००७ मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’मध्ये अभिनेता कल्याण रामसोबत तेलगूमध्ये पदार्पण केले. तिच्या तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतकी खास जादू दाखवू शकला नाही. तर त्याच वर्षी प्रदर्शित झालेला ‘चंदामामा’ हा चित्रपट तिचा पहिला सुपरहिट चित्रपट ठरला. त्यानंतर २००९ मधील एस एस राजमौली दिग्दर्शित ‘मगधीरा’ या ऐतिहासिक चित्रपटात ती दुहेरी भूमिकेत दिसली होती.
टॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झालेली काजल २०११ मध्ये पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमवण्यासाठी आली होती. तिने अजय देवगणच्या ‘सिंघम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली. अभिनेत्री काजल अग्रवालने व्यावसायिक गौतम किचलूसोबत लग्नगाठ बांधलीय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.