MyLek Film: सोनाली खरेच्या 'मायलेक'मध्ये उमेश कामतची एन्ट्री, नेमकी काय भूमिका साकारणार ?

Sonali Khare MyLek Film: चित्रपटाच्या पोस्टर, टीझर आणि एका गाण्यानंतर प्रेक्षकांच्या समोर चित्रपटातील एक नवं पात्र समोर आलं आहे. सध्या चित्रपटाचा नवा पोस्टर इन्स्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे.
Umesh Kamat Lead Role In Sonali Khare's Mylek Film
Umesh Kamat Lead Role In Sonali Khare's Mylek FilmInstagram

Umesh Kamat Lead Role In Sonali Khare's Mylek Film

आई आणि मुलीचे नाते हे सर्वात जवळचे आणि विशेष म्हणजे खास असते. या नात्यामध्ये आपल्याला अनेकदा घनिष्ट मैत्रिणीचं नातं पाहायला मिळते. तर अनेकदा ह्या मैत्रीत रुसवे फुगवेही पाहायला मिळतो. याच गोड मैत्रीतल्या नात्याची गोष्ट उलगडणारा 'मायलेक' चित्रपट येत्या १९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या पोस्टर, टीझर आणि एका गाण्यानंतर प्रेक्षकांच्या समोर चित्रपटातील एक नवं पात्र समोर आलं आहे. सध्या चित्रपटाचा नवा पोस्टर इन्स्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे. (Marathi Film)

Umesh Kamat Lead Role In Sonali Khare's Mylek Film
Urvashi Rautela: ऋषभ पंतमुळे पुन्हा ट्रोल झाली उर्वशी रौतेला, नेमकं कारण काय?; अभिनेत्रीने ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

चित्रपटामध्ये आतापर्यंत सोनाली खरे, सनाया आनंदचेच पात्र प्रेक्षकांच्या समोर आले आहेत. नुकतंच आता प्रेक्षकांच्या समोर मराठमोळा अभिनेता उमेश कामतचेही पात्र प्रेक्षकांच्या समोर आले आहे. पोस्टर शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शन दिले की, “नवीन नातं जोडण्यासाठी जुनं नातं विसरावं लागतंच असं नाही... मायराचा बेस्टफ्रेंड की मायराच्या आईचा बॉयफ्रेंड??” असं कॅप्शन त्याने दिले आहे. पोस्टर पाहाता चित्रपटामध्ये उमेशची नेमकी भूमिका काय असणार, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, या चित्रपटात उमेश एका वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. (Marathi Actors)

'मायलेक' कौटुंबिक चित्रपट आहे. हा चित्रपट प्रत्येक मुलगी आणि आईला जवळचा वाटेल, असा चित्रपट आहे. 'मायलेक' चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत. 'मायलेक' हा चित्रपट येत्या १९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. (Social Media)

Umesh Kamat Lead Role In Sonali Khare's Mylek Film
Myra Vaikul Funny Video: ‘तुझे दात कुठे गेले ?’; गंमतीशीर प्रश्नावर मायरा वायकुळचे मिश्किल उत्तर, म्हणाली...

आपल्या भूमिकेबद्दल उमेश कामत म्हणाला, “आई आणि मुलीच्या सुंदर नात्याची गोष्ट चित्रपटात दाखवली आहे. अशा चित्रपटाचा मी भाग आहे. मी स्वतः या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. माझ्या व्यक्तिरेखेबद्दल जास्त काही सांगणार नाही. मात्र एक नमूद करेन माझ्या इतर भूमिकांपेक्षा ही भूमिका निश्चितच वेगळी आहे. सोनाली आणि सनायासोबत काम करायचा अनुभवही भन्नाट होता. सोनाली एक उत्तम अभिनेत्री आहे हे सर्वांना माहित आहे. सनायालाही अभिनयाची उत्तम जाण आहे. ही 'मायलेक'ची जोडी भन्नाट आहे. रिअलमध्ये ही जोडी कमाल असल्याने रिलमध्येही ही केमिस्ट्री उत्तम जुळून आली आहे.” (Entertainment News)

Umesh Kamat Lead Role In Sonali Khare's Mylek Film
Crew Box Office Collection Day 4: पहिला सोमवार 'क्रू'साठी ठरला फायदेशीर, चौथ्या दिवशीही केली जबरदस्त कमाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com